अबब....दहा कोटी फक्त दुरुस्तीवर 

अबब....दहा कोटी फक्त दुरुस्तीवर 

बीड -  चिखल, खड्डे, गाळ अशा रस्त्यांतून वाट शोधताना बीडकरांच्या नाकी नऊ येत आहेत. अख्खा पावसाळा बीडकरांनी चिखलातून वाट शोधताना जीव मुठीत धरला; परंतु याच्या दुरुस्तीवर पालिकेला तब्बल दहा कोटी रुपये खर्च करायचे होते. सध्या टाकत असलेल्या मुरुमावर तर हा खर्च करायचा नव्हता ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीवर दहा कोटी रुपये खर्च करायचे होते, हे पालिकेच्या सभापतींच्या खुलासा पत्रकातूनच समोर आले आहे, हे विशेष. 

चार दिवसांपूर्वी पालिकेच्या 19 कोटी रुपयांच्या दहा निविदा रद्द करण्यात आल्या. काकू-नाना आघाडीच्या तक्रारींचे पाढे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांपर्यंत वाचले गेले. पालिकेने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून 19 कोटी रुपयांच्या दहा कामांच्या निविदा प्रसिद्ध करताना त्यात कामाचे नाव, पत्ता असा कुठलाही उल्लेख केला नाही. विशेष म्हणजे माध्यमांतूनही याला प्रसिद्धी दिली नाही, असा आरोप होता. दरम्यान, आघाडीकडून दिशाभूल आणि चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे पत्रक पालिकेचे सभापती सादेक जमा यांनी प्रसिद्धीस दिले आहे; परंतु याच पत्रकात त्यातले दहा कोटी रुपये हे दुरुस्त्यांसाठी होते असेही पत्रकात नमूद आहे.

सध्या शहरात नगरोत्थानमधून सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर, अमृत अटल व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांची सफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी पडून शहरात सर्वत्र चिखल झाला आहे. त्याची संबंधित यंत्रणेकडून सफाई करण्याऐवजी पालिका यावर मुरूम टाकून त्याचे दहा कोटी रुपये खर्चाचे टेंडर तर काढण्याच्या घाट बांधत नव्हती ना, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पालिकेने खुलासा करण्याची गरज 
सध्या बीडमधून रस्ता काढताना दुचाकींचे अपघात आणि वाटसरूंची तारांबळ उडत आहे; परंतु नागरिकांना होणारा त्रास असल्याने काही दुरुस्त्या करण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता. याची निविदा प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक बाबी राहिल्यामुळे हे काम थांबविण्यात आले होते. मात्र, त्याची पूर्तता करून पुन्हा त्याची निविदा काढण्यात आली, असे असताना विरोधकांनी हे काम होऊ नये यासाठी आयुक्तांकडे निविदा रद्द करण्याची मागणी केली, ती अत्यंत दिशाभूल करणारी असल्याचे विरोधकांनी पत्रकात म्हटले आहे.

सध्या शहरातील चिखलाच्या रस्त्यांवर मुरूम अंथरला जात आहे. या मुरुमामुळे चिखल कमी होण्याऐवजी पाऊस पडल्यानंतर दुप्पट होत आहे. या मुरुमाचे देयक तर दहा कोटी नव्हते ना, याचा खुलासा आता पालिकेने करण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com