ट्रक, ट्रॅव्हल्स अपघातात लातूरात दहा जखमी

हरी तुगावकर
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

येथील राजीव गांधी चौकात मंगळवारी दुपारी तुळजापूरहून लातूरला आलेली
ट्रॅव्हल्स चौकाला वळण घेत होती. त्याचवेळी बसवेश्वर चौकाकडून आलेल्या
ट्रकने या ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली.

लातूर : येथील राजीव गांधी चौकात ट्रक व ट्रॅव्हल्सच्या अपघातात
दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा अपघात मंगळवारी (ता. १४) एकच्या सुमारास घडला आहे.

येथील राजीव गांधी चौकात मंगळवारी दुपारी तुळजापूरहून लातूरला आलेली
ट्रॅव्हल्स चौकाला वळण घेत होती. त्याचवेळी बसवेश्वर चौकाकडून आलेल्या
ट्रकने या ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. यात ही ट्रॅव्हल्स दुभाजकावर
जावून आदळली. यात ट्रॅव्हल्सच्या मागच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.
यात मंगेश काकडे (वय २८, रा. आशिव, ता. औसा), अजय अरविंद राठोड (वय ३२, रा. सिंदाळा, ता. औसा), राजाभाऊ विठ्ठल राठोड (वय ३५, रा. धारूर), मोहन बंकट अंबेकर (वय ३५, रा. औसा), योगिता मोहन अंबेकर (वय ३०, रा. औसा), सुवर्णा पंडित गायकवाड (वय ४०), दिगंबर पवार (वय ३१, रा. खुंटेगाव, ता. औसा), शितल प्रदीप सोळंके (वय २५, रा. फत्तेपूर, ता. औसा), सुजाता मिलिंद कांबळे (वय २५, रा. रमाबाईनगर), अब्दूल चाँद शेख (वय ६०, रा. अलमला, ता. औसा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Ten people injured in truck accident in Latur