लातुरात आयटीआयसाठी दहा हजार अर्ज

Ten thousand applications for ITI in Latur
Ten thousand applications for ITI in Latur

लातूर - येथे होणाऱ्या रेल्वे बोगी तयार करण्याच्या कारखान्यामुळे
दहावी बारावी पास विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा वाढला आहे. जिल्ह्यातील अकरा आयटीआयच्या दोन हजार सहाशे जागे करीता दहा हजार मुला मुलींना अर्ज दाखल केले आहेत. या रेल्वे बोगीच्या कारखान्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने या मुलांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या मुलांचा कल फारच कमी झाला आहे. कौशल्य विकासात आयटीआयला अधिक महत्व आहे. आयटीआयचा एखादा अभ्यासक्रम पूर्ण केला की मुलाच्या हाताला रोजगार हमखास मिळतो असे असताना सुद्धा आयटीआयच्या अनेक अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहत असत. लातूर जिल्ह्यात तर शासकीय अकरा आयटीआय आहेत. यात वेल्डर, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, ओएएमटी, इलेक्ट्रीशन, वायरमन, पेंटर, कारपेंटर, इलेक्ट्राॅनिक मेकॅनिक, आयसीटीएसएम, प्लंबर,फाऊंड्रीमन, टेलरिंग, ड्राफ्समन मेकॅनिकल, एमएमव्ही, नळकारागीर, यांत्रिक डिझेल, सुईंग टेक्नॉलॉजी, विजतंत्री, यांत्रिक मोटार गाडी, कातारी असे अनेक अभ्यासक्रम आहेत. दरवर्षी या अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहत आहेत. पण यावर्षी मात्र या अभ्यासक्रमाकडे मुलांचा ओढा वाढल्याचे दिसत आहे.

येथील एमआयडीसीमध्ये येत्या काही महिन्यात रेल्वे बोगी तयार करण्याचा
कारखाना उभारणार आहे. या कारखान्यासाठी कौशल्य असलेले मनुष्यबळ लागणार आहे. ते मनुष्यबळ आयटीआयमधून मिळणार आहे. हे लक्षात आल्यानंतर या वर्षी मात्र आयटीआयला प्रवेशासाठी मुला मुलींची गर्दी वाढली आहे. जिल्ह्यातील अकरा आयटीआयमध्ये सर्व अभ्यासक्रमाच्या दोन हजार सहाशे जागा आहेत. या करीता ९ हजार ९७५ अर्ज दाखल झाले आहेत.

आयटीआयच्या प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी होती. प्रस्तावित रेल्वे बोगी
कारखान्यामुळे या वर्षी प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
प्रत्येक अभ्यासक्रमासाठी मुलींसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.
 - पी. डी. उखळीकर, प्राचार्य, आयटीआय

लातूर जिल्ह्यातील आयटीआयमध्ये असलेल्या उपलब्ध जागा व आलेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत.

 आयटीआय  एकूण जागा  प्रवेशासाठी आलेले अर्ज
 लातूर     १,०४७  ३,३३३
 मुलींचे आयटीआय   २१९   १६६
 औसा   ११०   ७०४
 रेणापूर   ११५   ५८४
 चाकूर   १३१   ६०१
 अहमदपूर   १५२    १,०९५
 उदगीर   ३६६    १,४२०
 देवणी   १६२   ३६१
 जळकोट   ४७    ३५०
 निलंगा   २३६   १,०१३
 शिरुर अनंतपाळ   ६८   ३४८
 एकूण   २,६५३  ९,९७५




आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com