चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य; दहा वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

औरंगाबाद - सहा वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या शेख सद्दाम शेख कडू याला विशेष न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक हजारांचा दंड ठोठावला. 

औरंगाबाद - सहा वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या शेख सद्दाम शेख कडू याला विशेष न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक हजारांचा दंड ठोठावला. 

सातारा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 20 ऑक्‍टोबर 2014 ला पीडित सहा वर्षीय मुलगा त्याचे मित्र आणि आरोपी शेख सद्दाम (वय 20) हे पतंग उडवत होते. त्यावेळी आरोपी सद्दामने पीडित मुलाला एका घराकडे इशारा करून पतंगाचा मांजा आणण्यास सांगितले. मुलगा मांजा आणण्यासाठी गेला, त्यावेळी आरोपी सद्दाम त्याच्या पाठोपाठ घरात गेला. त्याने घराची कडी लावली आणि पीडित मुलाला जिवे मारण्याची धमकी देत त्याच्यासोबत अनैसिर्गिक कृत्य केले. त्यानंतर चिमुकल्याने आपल्या आईला आपबिती सांगितली. त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात अनैसर्गिक कृत्य, बाललैंगिक अत्याचार या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी एन. के. बुट्टे यांनी आरोपीला अटक केली. तसेच मुलाचे कपडे जप्त करून तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले. संपूर्ण तपास करून या प्रकरणात आरोपी सद्दामच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी सात जणांच्या साक्ष नोंदवल्या. यात पीडित मुलगा, त्याची आई व तपास अधिकारी यांचे जबाब महत्त्वाचे ठरले. शिवाय डॉक्‍टरांनी आरोपी व पीडित मुलाच्या कपड्यांचा अहवाल सादर करीत रिपोर्ट सकारात्मक असल्याचे न्यायालयाला सांगितले. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी सद्दामला बाललैंगिक अत्याचार कलमान्वये दहा वर्षांची सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. त्याचप्रमाणे कलम 506 अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपयांचा दंड, दंड न भरल्यास 15 दिवसांची सक्तमजुरी, अशी शिक्षा सुनावली.

Web Title: Ten years rigorous imprisonment