गिरगांव येथे मारहाणीमुळे तणाव, पोलिस बंदोबस्त वाढवला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

वसमत तालुक्यातील गिरगांव येथे शुक्रवारी ( ता. 17) बंदला हिंसक वळण लागल्यामुळे गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी गावाला भेट देऊन शांतता समितीची बैठक सुरू केली आहे.

हिंगोली: वसमत तालुक्यातील गिरगांव येथे शुक्रवारी ( ता. 17) बंदला हिंसक वळण लागल्यामुळे गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी गावाला भेट देऊन शांतता समितीची बैठक सुरू केली आहे.

दिल्ली येथे संविधानाच्या अवमानप्रकरणी आज वसमत तालुक्यातील गिरगाव बंदचे आयोजन केले होते. सकाळ पासूनच मोठा जमाव बाजारपेठेत होता. यावेळी एक दुकान सुरू असल्यामुळे जमावाने दुकानातील जेष्ठ नागरिकास दुकान बंद करण्यास सांगितले. काही जणांनी दुकानदारास मारहाण केली. या मारहाणीमुळे गावातील वातावरण चांगलेच तापले.

दोन्ही कडे जमाव एकत्र आल्यामुळे तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती पोलिस विभागाला  मिळताच वसमतचे पोलीस उपाधिक्षक शशिकिरण काशीद, कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दोन्ही जमावाला शांत केले. त्यानंतर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभाग्रहात शांतता समितीची बैठक सुरू केली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Web Title: tension are increse in girgoan hingoli