ताणतणावाला जरा आरामानंच घ्या

Tension
Tension

नकारात्मक विचार टाळा, सहज माफी मागा अन्‌ माफ करायलाही शिका
औरंगाबाद- दिवसेंदिवस माणसाचे आयुष्य धकाधकीचे झाल्याने ताण-तणाव ओघानेच आला. वाढत्या शहरीकरणात ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. म्हणूनच ताण-तणावात राहण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. ताणतणावाचा निचरा केला तरच हृदयरोग अथवा अन्य आजारांपासून दूर राहणे शक्‍य आहे.

काय आहेत कारणे
मद्य, ड्रग्ज, धूम्रपान; तसेच अधुनिक जीवनशैली, वाढती स्पर्धा, बदलती आर्थिक धोरणे, तंत्रज्ञानातील प्रगती, नोकरीची असुरक्षितता, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, अनामिक भीती आणि चिंता, द्वेषाची भावना, नैराश्‍य, भावनिक ओढाताण, काल्पनिक भ्रम, मानसिक अहंकार, न्यूनगंड. 

काय होतोय परिणाम 
तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. मानसिक आजार सुरू होतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्‍य, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, एसिडीटी, अल्सर अशा व्याधींची सुरवात होती. 

मानवी मनातील अहंकार हा सगळ्या ताणतणावांना खत-पाणी घालणारा महत्त्वाचा घटक आहे. या सगळ्या शारीरिक, मानसिक, भावनिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया ही विपश्‍यना, ध्यान संमोहनशास्त्र आणि योग यामध्ये सापडते. औषधोपचाराने बरे न होणाऱ्या आजारांना यातून मुक्ती मिळविता येते. ताणतणावातून मुक्ती मिळविण्यासाठी जगभरात अनेक उपाय सुचविले आहेत. त्यात ध्यानधारणा, शवासन, योगनिद्रा व स्वयंसूचना यांचा सामावेश आहे. विपश्‍यनेने मनावरचा ताण हलका होऊन न्यूनगंड कमी होतो. ध्यान आणि स्वयंसूचना यामुळे मनोबल वाढविण्यास मदत होते. 
- गंगाप्रसाद खरात, योगशिक्षक तथा संमोहनतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com