फुफ्फुसांवरील ताण होणार कमी, चाकूरकर इंजिनिअर व डॉक्टर जोडगोळीने शोधले उपकरण

प्रशांत शेटे
Sunday, 25 October 2020

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो. पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफ्फुसांवरील ताण वाढतो.

चाकूर (जि.लातूर) : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो. पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफ्फुसांवरील ताण वाढतो. या समस्येवर मात करण्यासाठी पुणे येथे स्थायिक असलेल्या चाकूरच्या इंजिनीअर व डॉक्टरने शुध्द हवा देणाऱ्या एका उपकरणाचा शोध लावला आहे. त्यांच्या नावाने याचे पेटंट घेतले आहे. त्यांनी तयार केलेलं हे उपकरण कोरोना योद्ध्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही, पंकजा मुडेंची उद्धव ठाकरेंच्या मदतीवर टीका

कोरोनापासून बचावासाठी एन ९५ मास्कचा वापरा केला जात आहे. परंतू यापासून अनेक धोके असल्यामुळे विकसित देशांमध्ये पीएपीएआर या साधनाचा वापर केला जातो. कोरोनाच्या साथीमुळे पीएपीआरची मागणी वाढली असून तुटवडा जाणवत आहे. याची किंमत जास्त असल्यामुळे सर्वांना ते वापरण्यास अडचण येते. यावर मात करण्यासाठी पुणे येथील स्थायिक असलेले चाकूरचे अभियंता व्यंकटेश सुभाष सुवर्णकार व प्रसिध्द न्युरोसर्जन डॉ.भास्कर मधुकर केंद्रे, अभियंता अनिल रणवीर व शुभांगी व्यंकटेश सुवर्णकार यांनी एक हलका, छोटा, स्वस्त व प्रभावी अशा शुध्द हवा देणाऱ्या उपकरणाची निर्मिती केली आहे.

हे उपकरणं बनवताना तांबे, प्लास्टिक व व्हेंटिलटर वर वापरत येणारा एचएमई फिल्टर यांचा उपयोग करण्यात आला आहे. यातून कपाळा भोवती उच्च दाबाची शुद्ध हवा मिळते. त्यामुळे बाहेरची दुषित हवा आत येत नाही. याच्या वापरामुळे बॅक्टेरिया, विषाणू आणि धुळीपासून संरक्षण मिळणार आहे. हे उपकरण कोरोनाच्या संकट काळात कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावीत असलेले आरोग्य कर्मचारी, पोलीस, पालिकेचे कर्मचारी, बँकचे कर्मचारी, आशाताई यांना कोरोनापासून संरक्षण देईल. या शोधासाठीचे पेटंट नुकतेच घेण्यात आले आहे. सध्याच्या अनुमानानुसार कोरोनाची दुसरी लहर आपल्या भारतात येऊ शकते, अशा परिस्थितीमध्ये हे उपकरणं कोरोना योद्धांसाठी कवच ठरू शकणार आहे.

प्रशांत अमृतकर प्रकरणी कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा मंडळाचे संचालकांना नोटीस

 

कोरोनाच्या संकट काळात आलेल्या अनुभवावरून हे उपकरण तयार केले असून कोरोना योद्धा म्हणून काम करीत असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे.
- व्यंकटेश सुवर्णकार, अभियंता, पुणे.

मास्कच्या अतिवापरामुळे अनेक आजार होऊ शकतात. यासाठी शुद्ध हवेचा पुरवठा करणाऱ्या या उपकरणाचा शोध लावला असून याचा वापर केल्यामुळे कोरोनासह दुषित वातावरणापासून संरक्षण मिळणार आहे.
डॉ.भास्कर केंद्रे, न्युरो सर्जन, लातूर

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tension On Lungs Now Will Reduce, Engineer And Doctor Invented Respirator