कापड दुकानातील तरुणाची 'एटीएस'कडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - नालासोपारा प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शहरातील निराला बाजार येथील एका तरुणाला मंगळवारी (ता. 14) ताब्यात घेऊन मुंबईला नेले होते. त्याची कसून चौकशी सुरू असून, तो यापूर्वी अटकेतील एका संशयिताचा मित्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नालासोपारा येथे संशयित वैभव राऊत याच्या घरी शस्त्रसाठा सापडला होता. त्यानंतर नालासोपारा-औरंगाबाद संबंध समोर आले. एटीएसने केसापुरी (ता. औरंगाबाद) येथील शरद भाऊसाहेब कळसकर या तरुणाला उचलले होते. त्यानंतर एटीएसने शहरातील निराला बाजार येथील एका कापड दुकानात काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे त्याला यापूर्वीच "एटीएस'ने नोटीस दिली होती. सचिन अणदुरे असे त्याचे नाव असून तो कळसकरचा मित्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Terrorist Youth Inquiry by ATS