झेडपीच्या संभाव्य कारभाऱ्यांची चाचपणी 

file photo
file photo

नांदेड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीला काही तास उरल्याने सोमवारी (ता२० जानेवारी २०२०) पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रात्री उशीरापर्यंत संभाव्य अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विषय समिती प्रमुखांची चाचपणी केली. हॉटेल चंद्रलोकमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांंच्या अशा आकंक्षा जाणून घेत पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी उमेदवारांची नावे गोपनिय ठेवत उत्सुकता कायम ठेवली. 

महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेवून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पूर्वीच शिक्कामोर्तब केला. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिाकऱ्यांची सोमवारी दुपारी स्वतंत्र बैठकाद्वारे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भावना जाणून घेतल्या. काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटकपक्षातील भावी कारभाऱ्यांच्या निवडीसाठी रात्री उशीरापर्यंत पक्षश्रेष्ठींमध्ये खलबते सुरु होती. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून चार दावेदार असले तरी पालकमंत्री श्री. चव्हाण यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कारभारी पदाची माळ गळ्यात पडावी या अपेक्षेने ईच्छुकांच्या भाऊगर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींची दमछाक होत आहे. 

सदस्यांची चाचपणी 
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्य निवडीच्या अनुषंगाने हॉटेल चंद्रलोक येथे महाविकास आघाडीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. निवड प्रक्रियेसाठी संभाव्य उमेदवार सायंकाळी बैठकीद्वारे ठरवण्याचे जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना हॉटेल चंद्रलोक मध्ये मुक्काम ठोकावा लागला. दरम्यान, रात्री उशीरा ‘चंद्रलोक’ येथे दाखल झालेल्या काऊन्सलिंगमध्ये पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी प्रत्येक सदस्यांच्या स्वतंत्र कौन्सलींगद्वारे भावना जाणून घेतल्या. 

उत्सुकता कायम
काँग्रेसच्या चारही दावेदार महिलांची काऊन्सलींग नंतर पालकमंत्री अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार अशा अपेक्षेने हॉटेल चंद्रलोकमधील पदाधिकारी, सदस्य कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. पण काँग्रसेमधील सर्व पदाधिकारी, सदस्यांच्या कौन्सलींग नंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता.२१) सकाळी दहा वाजेपर्यंत वेळ असल्याचे सांगत उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम ठेवला. 

निवड प्रक्रियेला सुरवात 
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी १० वाजेपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला सुरवात झाली. महाविकास आघडीकडून अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून मंगाराणी अंबुलगेकर या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सभागृहात दाखल झाल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून समाधान जाधव यांची उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी थोड्याच वेळात दाखल होणार असल्याचे संंकेत आहेत. पिठासीन अधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अधिपत्याखाली निवड प्रक्रिया घेण्यात येत आहे. 
----  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com