म्हणून शरद पवार आले नाहीत... :  माजी मंत्री मीनाक्षी पाटील

सुषेन जाधव
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना येऊ दिलं नाही, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी औरंगाबादेत दिली.

औरंगाबाद : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाशी (शेकाप) नाळ जुडलेली आहे, म्हणून ते शेकापच्या १७ व्या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी येणार होते. मात्र मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना येऊ दिलं नाही, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी औरंगाबादेत दिली.

शेकापच्या १७ व्या अधिवेशनदरम्यान त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जयंत पाटील, प्रवीण गायकवाड, विवेकानंद पाटील, भाई धैर्यशील पाटील, निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, विकास शिंदे यांच्यासह पक्षाच्या राज्यातील मान्यवरांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी गणपतराव देशमुख होती. १ ते २ ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन होत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Thats why Sharad Pawar did not come says Former minister Meenakshi Patil