esakal | शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे सीईओनी काढले आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

 teachers to work from home

शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे सीईओनी काढले आदेश

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने शासनाने १४ एप्रिल रोजीच्या रात्री ८ पासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन यांनी १४ एप्रिलला आदेश काढून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.

जिल्ह्यात यापुर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ७ जानेवारी २०२१ ला जिल्ह्यातील ५ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मान्यता दिल्याने ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकांना शुन्य टक्के तर १ ली ते ४ थी पर्यंतच्या शिक्षकांना ५० टक्के शाळेत उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या त्यानंतर मार्च महिन्यात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यानंतर सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याच्या सुचना होत्या. त्यामुळे शिक्षक शाळेत सकाळी १० ते ४ वेळात उपस्थित राहून स्वाध्याय सोडविणे, शाळेतील विविध कामे करत. मात्र शासनाने १४ एप्रिल २०२१ पासून ज्यात ब्रेक द चेन लागू करून संचारबंदी लागू करण्यात आली होती. शाळा बंद पण शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र आदेश काढल्यामुळे शिक्षकांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

या संदर्भात शिक्षक, शिक्षक संघटनांकडे विचारणा करत असत विविध शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन शाळेत शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी आदेश काढण्याची मागणी केली, या मागणीचा विचार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्य अधिकारी राधाबिनोद शर्मा व शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी आदेश काढून शिक्षकांनी कामाशिवाय शाळेत उपस्थित राहू नये, तसेच वर्क फ्रॉम होम विद्यार्थ्यांना अध्यापन करणे, स्वाध्याय सोडवून घेणे, शाळा विषयी माहिती भरणे यासह इतर कामे करण्यात यावी. तसेच कोरोना संबंधित आवश्यक ते काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आदेशामुळे शाळेत उपस्थित राहण्या संदर्भात शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला आहे. या निर्णयाचे शिक्षक संघटनानी स्वागत केले आहे.