Crime : दांपत्याने गळफास घेऊन जीवन संपवलं; काही महिन्यांपूर्वीच केला होता आंतरजातीय विवाह

Suicide
Suicidesakal

आष्टी - पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघळूज (ता. आष्टी) येथे मंगळवारी (ता. २३) घडली. पतीचा मृतदेह काल सायंकाळी तर पत्नीचा मृतदेह आज सकाळी आढळला. कडा येथे उत्तरीय तपासणीनंतर दोघांच्या पार्थिवावर वाघळूज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Suicide
Devendra Fadnavis: ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले उद्धव ठाकरे कोणासोबत देखील...

ईश्वर बबन गुंड (वय ३४) व ऋतुजा बबन गुंड (२४) यांनी काही महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. विवाहानंतर हे दांपत्य मुंबईला गेले होते. तेथून परतल्यावर ते वाघळूज गावात शेती करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांना तीन महिन्यांची मुलगी आहे.

काल सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हे दांपत्य कांदे झाकण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळी उशिरा ईश्वर बबन गुंड यांचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. काही अंतरावरच ऋतुजा बबन गुंड हिचाही अशाच स्थितीतील मृतदेह आज आढळला. दोघांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. दोघांनी गळफास घेतला की अन्य काही कारण आहे, याचा तपास अंभोरा पोलिस करीत आहेत.

Suicide
NA Permission : राज्यातील सर्व महापालिकांना आता एनए परवानगीचे अधिकार

दरम्यान, तालुक्यातील चिंचोली येथे काल कर्जाला कंटाळून अंकुश बाबूराव एकशिंगे (४४) या शेतकऱ्याने विष घेऊन मृत्यूला कवटाळले. या घटनेला काही तास उलटताच हा प्रकार उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com