esakal | औंढा तालुक्यातील पुरात वाहुन गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada

औंढा तालुक्यातील पुरात वाहुन गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव (Nandgaon) शिवारात नंदगाव भोसी (Bhosi) नदीच्या (River) पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा (Farmer) मृतदेह (Deathbody) रविवारी सकाळी सापडला आहे. याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार औंढा तालुक्यातील नांदगाव (Nandgaon) येथील शेतकरी संजय धनवे (Sanjay Dhanve) वय ३८ यांचे नंदगाव भोसी नदीच्या पलीकडे पाच एकर शेत आहे.

शनिवारी धनवे कुटुंबियासह शेतात गेले होते. सायंकाळी सर्व जण घरी परतले. त्यानंतर सहा वाजता धनवे हे दूध आणण्यासाठी शेताकडे निघाले होते. शेतात जाण्यासाठी नंदगाव येथील भोसी नदीचे पात्र ओलांडून जावे लागते. या नदीच्या पत्रामध्ये धनवे पाण्यातून जात असताना पाणी वाढले त्यामुळे पुर आला पाण्याचा वेगही वाढला नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या त्यांच्या भावाने ओरडून येऊ नको असा इशारा केला.

मात्र तोपर्यंत धनवे हे नदीच्या मध्यभागी पोहोचले होते. पुराचे वाढलेल्या पाण्यात धनवे वाहून गेले.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे जमादार दिघाडे , यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच गावकऱ्यांनीही घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला

नंतर धनवे यांचा शोध सुरू केला. रात्री ते सापडले नाही. रविवारी सकाळी घटनास्थळापासून दिड ते दोन किलोमीटर अंतरावर संजय धनवे यांचा मृतदेह आढळला. पोलीस व गावकऱ्यांनी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. याप्रकरणी औंढा ण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत शेतकरी धनवे यांच्या पश्चात आई - वडील , पत्नी , एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

loading image
go to top