कलंक पुसतोय; स्त्री जन्मदरवाढीचा अभिमान वाढतोय

बीड जिल्ह्यातील बदलते चित्र ; मुलींचा जन्मदर ७९७ वरुन ९५१ वर
कलंक पुसतोय; स्त्री जन्मदरवाढीचा अभिमान वाढतोय

बीड : कधी स्त्री भ्रूण हत्या तर कधी गर्भपिशव्या काढून टाकण्याचे प्रकार तर कधी मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात जिल्ह्याचा आरोपी. या अशा घटनांमुळे जिल्ह्यावर कायम मुंबईपासून अंतरराष्ट्रीय माध्यमांची कायम नजर. असेच स्त्री भ्रूण हत्यांमुळे जगभर कलंकीत झालेल्या जिल्ह्याचा माथा आता उजळत आहे. ७९७ असलेला स्त्री जन्मदर आता तब्बल ९५१ वर पोचला आहे.

नऊ - दहा वर्षांत स्त्री जन्मदरात तब्बल १५४ नी वाढ झाली आहे. जिल्ह्याचा अभिमान वाढविण्याच्या या यशात आरोग्य विभाग, पोलिस, महसूल, आशा - अंगणवाडी सेविका आणि सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांचा वाटा आहे.मुलगी नको मुलगाच हवा, ही मानसिकता काही गाव खेड्यातील अशिक्षीतांचीच नाही तर उच्चभ्रू व उच्चशिक्षीतांमध्येही बऱ्यापैकी आहे. मात्र, मानसिकतेत देखील बदल होत असून यंत्रणांची नजर व जनजागृतीयामुळे आता जिल्ह्याची मान उंचावत आहे. जिल्ह्यात २०११ -१२ मध्ये स्त्री जन्मदर जेमतेम ७९७ इतका होता. याच काळात स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर घटना समोर आल्या. बीड व परळी हे गर्भपातांची मुख्य केंद्र होती. परळीत तर परराज्यातूनही गर्भपातांसाठी लोक येत. दोन शहरांसह अनेक ठिकाणी गर्भलिंग तपासणी व गर्भपाताचे प्रकार घडले.त्यामुळे देशभर बीडची प्रतिमा मलिन झाली. स्त्री भ्रूण हत्या करणारा जिल्हा असा कलंक बीडच्या माथी लागला. मुंबईपासून, दिल्ली व अंतरराष्ट्रीय माध्यमांच्याही जिल्हा केंद्रस्थानी होता. या काळात जिल्ह्यात स्त्री जन्मदर हजारामागे ७९७ एवढा कमी होता.

स्त्री जन्मदर वाढविण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान, प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान ,प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी देखील जिल्ह्यात प्रभावीपणे झाल्याचे वाढत्या स्त्री जन्मदरामुळे सिद्ध झाले आहे.ग्रामीण आरोग्य यंत्रणेने गर्भवतींवर तसेच विशेष करुन एक किंवा दोन मुली असलेल्या महिलांवर गर्भधारणेपासून ते बाळंतपणापर्यंत ट्रॅकिंग सिस्टीमच्या माध्यमातून वॉच ठेवला. तसेच सोनोग्राफी केंद्रांवरील गर्भवतींची तपासणी, गर्भपात केंद्रांतील गर्भपात यावर देखील आरोग्य यंत्रणेचा पुर्ण वॉच आहे. तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व संघटनांकडून होणाऱ्या जनजागृती व प्रयत्नांचाही यात मोठा वाटा आहे. म्हणून आता स्त्री जन्मदरात आश्वासन सुधारणा झाली आहे. सध्या बीडचा स्त्री जन्मदर ९५१ इतका आहे. तथापि, शासनाचा उद्देश हजार मुलामागे ९९४ मुली असावा असा आहे.

कलंक पुसतोय; स्त्री जन्मदरवाढीचा अभिमान वाढतोय
नांदेडला तीन दिवसात १३ हजार लसीकरण

स्त्री अधिकाऱ्याचे धाडस; पडद्यामागचेही हात

दरम्यान, तत्कालिन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गौरी राठोड यांच्या काळात स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार समोर आले. स्त्री भ्रूण हत्या करणारे डॉक्टरी पेशातीलच असले तरी त्यांचा वावर गुंडांसोबत आणि कृत्यही एखाद्या गँगस्टरांपेक्षा कमी नव्हते. मात्र, डॉ. राठोड यांनी कारवायांचा धडका उठविला. अगदी त्यांच्या कोंडून धमकावण्याच्या घटना घडल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नाही. अनेक सोनोग्राफी सेंटर, गर्भपात केंद्रांना तर कुलूप लावलेच. पण, अनेक गळ्यात स्टेथो अडकवून गर्भातील कळ्यांचे मारेकरी असलेल्यांना त्यांनी जेलची हवा दाखविली. काही डॉक्टरांचे वैद्यकीय परवानेही त्यांनी निलंबीत केले. तत्कालिन पोलिस कर्मचाऱ्यांनीही उच्च प्रतिची कामगिरी केली. तेव्हापासूनच खरा या प्रकारांना पायबंद बसला. तरीही परळीत मागच्या वर्षी काही काळासाठी जेलबाहेर असलेल्या डॉ. सुदाम मुंडेच्या दवाखान्यात असे प्रकार सुरु असल्याचे समोर आले होते. तत्कालिन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी यावर कारवाई केली. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, सामाजिक संघटनांच्या कामांमुळेही यात मोठा फरक झाला.

वाढता वाढता वाढे स्त्री जन्मदर (हजारामागे मुली)

साल : मुलींची संख्या (हजारामागे)

  1. २०११ - १२ : ७९७.

  2. २०१२ - १३ : ८९३.

  3. २०१३ - १४ : ९१६.

  4. २०१४ - १५ : ९१३.

  5. २०१५ - १६ : ८९८.

  6. २०१६ - १७ : ९२७.

  7. २०१७ - १८ : ९३६.

  8. २०१८ - १९ : ९६१.

  9. २०१९ - २० : ९४७.

  10. २०२० - २१ : ९५१.

गर्भवतींची सोनोग्राफी केंद्रांवर यंत्रणेचे लक्ष आहे. १२ आठवड्यांपुढे गर्भाचे लिंग सोनोग्राफीत कळते. त्यामुळे या काळापुढील गर्भपात सक्षम कारण व परवानगीशिवाय करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा बसून स्त्री जन्मदर वाढत आहे.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकीत्सक, बीड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com