गेवराई (जि. बीड) : दोघांना मारहाण करून चोरट्यांनी संसारपयोगी साहित्याची फेकाफेक करत दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता. १०) पहाटे तालुक्यातील भडंगवाडी येथे घडली.
चोरट्यांनी सरपंच ज्ञानेश्वर राधाकिसन नवले यांचे घरी प्रवेश केला. लहान मुलाला चाकू लावला व आवाज करू नका अशी धमकी दिली,यामध्ये जनकाबाई सुदाम केंकरे (वय.60)राणी दशरथ केंकरे(वय.25) या दोन महिलांना चोरट्याने मारहाण केली. या मारहाणीत जनकाबाई केंकरे गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास मादळमोही पोलीस करत आहेत.या घटनेमुळे भडंगवाडी गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.