शिक्षकाची फसवणुक करून 55 हजार लंपास

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 17 जुलै 2019

-  शहराच्या तरोडा परिसरातील पवनसाईनगर भागात राहणारे शिक्षक अशोक राऊतवाड यांची अज्ञात चोरट्याने फसवणूक केली.

- त्यांच्या  बँक खात्यातून चोपन्न हजार ८१४ रुपये त्या चोराने लंपास केले.

नांदेड : "हॅलो...मी बँकेतून बोलत आहे...आपले एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे....आता आलेला मोबाईलवरील ओटीपी क्रमांक सांगा" असे म्हणून चोराने संंबंधीतांच्या बँक खात्यातून पंचावन्न हजार रुपये लंपास केले. ही घटना साईनगर, मालेगाव रोड, तरोडा येथे शुक्रवारी (ता. १२) घडली. मात्र या प्रकरणाची तक्रार बुधवारी (ता. १७) देण्यात आली

 शहराच्या तरोडा परिसरातील पवनसाईनगर भागात राहणारे शिक्षक अशोक राऊतवाड यांना एका नंबरवरून शुक्रवारी दुपारी दोन वाजता फोन आला. फोनवरून ''मी बँकेतून बोलत आहे. आपले एटीएम कार्ड ब्लाॅक झाले आहे. ते पुन्हा सुरू करायचे आहे. त्यासाठी मी आपल्या मोबाईलवर ओटीपी टाकला आहे. तो मला परत सांगा." असे विचारताच शिक्षक असलेल्या राऊतवाड यांनी तो ओटीपी समोरच्या व्यक्तीला दिला. त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या बँक खात्यातून चोपन्न हजार ८१४ रुपये काढल्याचा दुसरा संदेश धडकला.

यानंतर त्यांना चांगलाच घाम फुटला. घडलेला प्रकार कुणाला सांगावे तर वेड्यात काढतील म्हणून ते सहा दिवस शांत राहिले. त्यानंतर मात्र भाग्यनगर पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदवली. यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft of 55 thousand from a teachers bank account