मनप्पुरम फायनान्सची शाखा फोडण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मनप्पुरम फायनान्स कंपनीची विष्णुनगर येथील शाखा फोडून दोघांनी चोरीचा प्रयत्न केला. ही बाब गुरुवारी (ता. आठ) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली.

औरंगाबाद - मनप्पुरम फायनान्स कंपनीची विष्णुनगर येथील शाखा फोडून दोघांनी चोरीचा प्रयत्न केला. ही बाब गुरुवारी (ता. आठ) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली.

या प्रकरणी सुनील साहेबराव दराडे (रा. केकत जळगाव, ता. पैठण) यांनी तक्रार दिली. ते मनप्पुरम फायनान्स कंपनीत काम करतात. बुधवारी मध्यरात्री मनप्पुरम फायनान्स शाखेत दोन चोर आले व त्यांनी ग्रीलचे कुलूप तोडले. शटरचे कुलूप तोडून ते उचकटले. आत घुसून चोरांनी चोरीचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही.

हा प्रकार गुरुवारी पहाटे समोर येताच दराडे यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास जमादार बोऱ्हाडे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft attempt in Manappuram Finance