चोरट्यांच्या हल्ल्यात सिल्लोडमध्ये एक ठार एक गंभीर

जखमी लक्ष्मण पुंजाजी मोरे
जखमी लक्ष्मण पुंजाजी मोरे

सिल्लोड - शहरातील नीलम चौकातील भराडी वाईन शॉपमध्ये कामावर असलेल्या दोन जणांवर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. १२) सिल्लोड-भराडी रस्त्यावरील जयभवानीनगर परिसरात रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, वाईन शॉपवर कामावर असलेले कर्मचारी भिकन देवबा जाधव व लक्ष्मण पुंजाजी मोरे हे दोघे रोजच्याप्रमाणे भराडी वाईन शॉप हे दुकान बंद करून दुकानातील रक्‍कम सोबत घेऊन ते घरी चालले असता दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात भिकन जाधव यांचा मृत्यू झाला.

लक्ष्मण मोरे गंभीर जखमी झाले. त्यांच्याजवळ असलेली रोख रक्‍कम अंदाजे तीन लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले. जखमी व मृतास शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. पोलिसांनी वेगाने सूत्रे हलविली असून उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्‍वास पाटील यांनी घटनास्‍थळी भेट देवून पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com