एटीएमचा क्रमांक विचारून घातला दीड लाखाला गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काहीजण मोबाईल क्रमांकावर फोन करून एटीएम कार्डचा पिन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकाची मागणी करत आहेत. त्यामुळे असे कॉल करणाऱ्यांवर विश्वास ठेवून कोणीही त्यांना एटीएम कार्डचा पिन क्रमांक, आधार कार्ड क्रमांक अथवा कोणत्याच प्रकारचे बॅंक डिटेल्स सांगू नयेत, असे आवाहन शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी केले

बीड - मोबाईलवरून एटीएमचा पिन क्रमांक विचारून अज्ञात व्यक्तीने बॅंक खात्यातून 1 लाख 40 हजार रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 11) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड तालुक्‍यातील भवानवाडी येथील अरुण सोनाजी जगताप यांना एकाने मोबाईलवर कॉल करून तुमचे एटीएम कार्ड बंद पडल्याचे सांगून ते सुरू करण्यासाठी आधारकार्ड क्रमांक देण्यास सांगितले. त्यामुळे जगताप यांनी आधारकार्ड क्रमांक त्या व्यक्‍तीस सांगितला. नंतर संबंधिताने एटीएम कार्डचा पिन क्रमांक मागितला असता जगताप यांनी त्यावर विश्वास ठेवून एटीएमचा पिन क्रमांक सांगितला. त्यानंतर काही वेळातच जगताप यांच्या खात्यातून 1 लाख 40 हजार रुपये काढल्याचा मॅसेज मोबाईलवर आला. त्यांच्या खात्यात एकूण 2 लाख 20 हजार रुपये होते. त्यातून कॉल करणाऱ्या व्यक्‍तीने 1 लाख 40 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अरुण जगताप यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी सायंकाळी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कोणालाही देऊ नका माहिती
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काहीजण मोबाईल क्रमांकावर फोन करून एटीएम कार्डचा पिन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकाची मागणी करत आहेत. त्यामुळे असे कॉल करणाऱ्यांवर विश्वास ठेवून कोणीही त्यांना एटीएम कार्डचा पिन क्रमांक, आधार कार्ड क्रमांक अथवा कोणत्याच प्रकारचे बॅंक डिटेल्स सांगू नयेत, असे आवाहन शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी केले.

Web Title: theft in beed