बीडमध्ये प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात चोरी! देवीचं मंगळसूत्र केलं लंपास : Beed theft | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tuljabhavani mandir

Beed theft: बीडमध्ये प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात चोरी! देवीचं मंगळसूत्र केलं लंपास

बीडमधील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. कहर म्हणजे चोरट्यांनी देवीचं मंगळसूत्र देखील सोडलेलं नाही. या प्रकरामुळं शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. (theft in famous Tuljabhavani temple in Beed city)

बीडमध्ये गेल्याकाही दिवसांत जबरी चोऱ्या, घरफोड्याचं सत्र सुरु आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. पण आता चक्क मुख्य वस्तीत असलेलं आणि लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या खासबाग मंदिर इथल्या तुळजाभवानीच्या मंगळसूत्रासह दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे.

इतकी मोठी चोरी करणारे हे सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं पोलिसांना यांचा शोध घेणं आव्हान असणार आहे. मंदिरात चोरी तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दागिने चोरी झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली.

टॅग्स :Maharashtra NewsBeed