esakal | चोरी करून नुसतीच मारहाण नाहीतर चाकून वार केले; वाशीतील थरारक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad

चोरी करून नुसतीच मारहाण नाहीतर चाकून वार केले; वाशीतील थरारक घटना

sakal_logo
By
नेताजी नलावडे

वाशी (उस्मानाबाद): अज्ञात चार चोरट्यांनी एकाला चाकुचा धाक आणि मारहाण करत चोरी केली आहे. घरातील सोने व रोख रक्कम १३ हजार रुपये असा एकूण एक लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना बुधवारी (ता.१४ ) रोजी पहाटे चारच्या सुमारास येथील नवीन बसस्थानक परिसरात घडली. या घटनेत जखमी झालेले सौदागर जगताप यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून शहरासह परिसरात चोरीच्या घटनात वाढ होत आहे. त्यात झालेल्या चोरींचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सौदागर जगताप हे येथील नवीन बसस्थानक परिसरात आई, वडिल, पत्नी व दोन मुलांसह राहतात. पहाटे चार वाजता पत्नी स्वाती यांना कपाटाच्या आवाजाने जाग आल्याने त्या झोपेतून उठल्या यावेळी कपाट उघडून चोरटे चोरी करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत पती सौदागर व कुटुंबातील इतर सदस्यही झोपेतून जागे झाल्याने त्यांनी चोरी करण्यास चोरट्यांना विरोध केला.

हेही वाचा: Amazon च्या 'प्रोजेक्ट कुइपर'साठी फेसबुकमधील तज्ज्ञांची टीम

यावेळी चोरट्यांनी सौदागर जगताप यांच्या चेहऱ्यावर चाकूने वार केला. नंतर सर्वांना शांत राहण्यास सांगून चाकूचा धाक दाखवून थांबवले. कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन चोरट्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानतंर पोलिस उपनिरिक्षक चौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. स्वाती जगताप यांच्या फिर्यादीवरुन वाशी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

loading image