निवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर फोडले

Theft retired police inspector broke into the house
Theft retired police inspector broke into the house

नांदेड : निवृत्त न्यायाधिशाचे घर फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका निवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडले. या प्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाढत्या घटनामुंळे नागरिक भयभीत झाले आहेत. 

भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत एका निवृत्त न्यायाधिशाचे घर फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे प्रकार कमी झाले असतांनाच मंगळवारी (ता. 29) दुपारी परवानानगर भागातील निवृत्त पोलिस निरीक्षक मिर्झा वहाब बेग यांचे घर फोडले. त्यांची पत्नी घराला कुलूप लावून शेजारीच असलेल्या बहिणीकडे गेल्या होत्या. दुपारी साडेतीन ते सहाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या सुरक्षा भिंतीवरुन प्रवेश करून कुलूप तोडले.

घरात घूसून कपाटातील सान्याचे लॉकेट, अंगठ्या, पेन्डॉल असे सोन्याचे सव्वा लाखाचे दागिने लंपास केले. मिर्झा बेग यांच्या पत्नी घरी आल्यानंतर आपल्याकडे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या परिवाराला सांगितले. रात्रीच मिर्झा बेग यांनी भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. घरफोडीची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या श्वान पथकालाही पाचारण केले. मात्र चोरट्यांचा माग लागला नाही. मिर्झा वहाब बेग यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार संगिता कदम ह्या करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com