'शेंड्या'ने फोडले स्नॅक्‍स सेंटर; लांबविल्या प्लेट अन्‌ सिलिंडर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात दिवाळीनंतरही चोरट्यांची दिवाळी सुरूच आहे. दुचाकी चोरीचे गुन्हे तर रोजच दाखल होताहेत. मोठी दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच आहे. त्यात भुरटे चोरही वाढल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. आता तर चोरटे छोटी-छोटी दुकानेही 'लक्ष्य' करून लागले आहेत. रविवारी तर दोघा चोरट्यांनी स्नॅक्‍स सेंटर फोडून लांबविले काय
तर सिलिंडर अन्‌ जुन्या-नव्या प्लेटा! 

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात दिवाळीनंतरही चोरट्यांची दिवाळी सुरूच आहे. दुचाकी चोरीचे गुन्हे तर रोजच दाखल होताहेत. मोठी दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच आहे. त्यात भुरटे चोरही वाढल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. आता तर चोरटे छोटी-छोटी दुकानेही 'लक्ष्य' करून लागले आहेत. रविवारी तर दोघा चोरट्यांनी स्नॅक्‍स सेंटर फोडून लांबविले काय
तर सिलिंडर अन्‌ जुन्या-नव्या प्लेटा! 

सिडको, एन- पाच येथील स्नॅक्‍स सेंटर व आम्लेटची गाडी फोडून साहित्य चोरणाऱ्या दोन अट्टल संशयितांना सिडको पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून रिक्षा, साहित्य असा एक लाख 52 हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त केला. सुनील ऊर्फ शेंड्या नानासाहेब मोहिते (वय 29, रा. एन- 6, सिडको) व गणेश भगवान वळसे (25, रा. सिंहगड कॉलनी) अशी
संशयितांची नावे आहेत. 
  
मध्यरात्री केला प्रकार 
जयभवानीनगर येथे गणेश सुखदेव राऊत (42, रा. तिरुपती कॉलनी) यांची एन-5 मधील धर्मवीर संभाजी शाळेच्या भिंतीजवळ स्नॅक्‍स सेंटर व अंडा आम्लेटची गाडी आहे. श्री. राऊत हे रात्री साडेदहाच्या सुमारास स्नॅक्‍स सेंटर बंद करून घरी जातात. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास संशयित दोघांनी ती फोडून गॅस सिलिंडर, प्लेट लांबविल्या. यात स्नॅक्‍स सेंटरच्या साहित्याचेही काही प्रमाणात नुकसान केले. याप्रकरणी श्री. राऊत यांच्या तक्रारीनुसार, सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 

औरंगाबादमध्ये हे काय घडले : रात्री गेली बर्थडे पार्टीला, मित्राने पाजले गुंगीचे औषध, मग... 
 

कसा सापडला शेंड्या? 
रविवारी (ता. 17) पहाटे सिडको पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यावेळी शेंड्या व गणेश रिक्षातून चोरीचे साहित्य घेऊन जात असल्याची माहिती सिडको पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने या दोघांना सकाळी साडेआठच्या सुमारास ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरवातीला त्यांनी आढेवेढे घेतले. 'ते आम्ही नव्हेच' असा त्यांचा पवित्रा होता; परंतु पोलिसांनी
आपला खाक्‍या दाखविताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले. पोलिसांना त्यांनी राऊत यांचे स्नॅक्‍स सेंटर व आम्लेटची गाडी फोडल्याची कबुली दिली; तसेच साहित्य लांबविल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी रिक्षा व अडीच हजारांचे साहित्य जप्त केले. त्यांच्याविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही कारवाई सिडको ठाण्याचे उपनिरीक्षक
बाळासाहेब आहेर, जमादार नरसिंग पवार, राजेश बनकर, स्वप्नील रत्नपारखी, लालखॉं पठाण यांनी केली. 

महत्त्वाची बातमी :  दहावी पास आहात का? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft in snack center At Aurangabad