esakal | वाळूज : एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतीकात्मक छायाचित्र.

या प्रकारामुळे येथील कामगार, नागरिक, उद्योजक, व्यावसायिक यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

वाळूज : एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोचा ऐवज लंपास

sakal_logo
By
आर. के. भराड

वाळूज (जि. औरंगाबाद) - वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून लूटमार, हाणामाऱ्या, चोरी, घरफोडी आणि अपहरणाच्या विविध घटनांमध्ये वाढ होत आहे. घराकडे परतणाऱ्या एका कामगारास भरदुपारी मारहाण करत त्याच्या गळ्यातील साखळी हिस्कावल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांनी एक बंद घर, एक मेडिकल दुकान व एका कंपनीतील साहित्य लंपास केल्याचे आज (ता. तीन) उघडकीस आले. या प्रकारामुळे येथील कामगार, नागरिक, उद्योजक, व्यावसायिक यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

सिडको वाळूज महानगर-1 मधील के. जी. पाणकर यांच्या प्लॉट क्र 83 येथील दुमजली बंगल्यात एनआरबी कंपनीचे सुधीरसिंग राजूपत हे भाडेकरू आहे. राजपूत यांच्या आईची प्रकुती अचानक बिघडल्याने ते शनिवारी (ता.31) कुटुंबासह गावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडून कपाटातील लाखो रुपये किमतीच्या सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह लाखोंच्या ऐवजावर हात साफ केला. हा चोरीचा प्रकार मंगळवारी (ता.3) सकाळी उघडकीस आला. मात्र या घरफोडीत नेमका किती ऐवज चोरी झाला. या विषयी ठोस माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे राहुल रोडे, पोलीस उपनिरीक्षक आर. एम. बांगर, वसंत शेळके, प्रकाश गायकवाड, बंडू गोरे, राजकुमार सूर्यवंशी यांच्यासह ठसे तज्ज्ञ विभागाचे सहायक निरीक्षक वैभव धाडगे,अभिजित खोतकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

तर दुसरी घटना बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात घडली. येथील संतोष कुंटे यांचे मेडिकल दुकानाचे शटर चोरटयांनी उचकटून गल्ल्यातील रोख 10 ते 12 हजार रुपये लंपास केले. नेहमीप्रमाणे कुंटे हे सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. तर तिसरी घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील वेल्डिंग मशीन व इतर मालासह काही भंगार साहित्य चोरटयांनी लांबवीले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मात्र या तिन्ही चोरीच्या घटनेविषयी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. 
 

loading image
go to top