तर जालन्यातुन अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी : गोरंट्याल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

जालना : येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी नांदेड येथून लोकसभा निवडणुक लढवली तर जालन्यातुन अमिता अशोकराव चव्हाण यांनी लोकसभा लढवावी अशी आमची मागणी असणार आहे, असे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे.

गुरुवारी (ता. 24) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले की, राहुल गांधी हे मराठवाड्यातुन लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार असतील तर ते नांदेड येथून उभे राहतील असा अंदाज आहे. मुबंई येथे (ता. 26) जानेवारी रोजी  बैठक होणार आहे. ही बैठक प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी अमिता चव्हाण यांनी जालना लोकसभा निवडणुकी लढवावी अशी आमची मागणी असणार आहे, असे माजी आमदार गोरंट्याल म्हणाले.

Web Title: then give candidateship to Amita Chavan from Jalana says Kailas Gorantyal