...तर त्यांच्यासोबत ढिश्‍यूम.. ढिश्‍यूम... करा : महापालिका आयुक्त

then start fighting says Municiple Corporation
then start fighting says Municiple Corporation

औरंगाबाद : शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वास्तूंची समाजकंटकांकडून तोडफोड केली जाते. अनेकजण कचरा टाकतात. समजून सांगितल्यानंतरही अनेक जण ऐकत नाहीत. त्यांच्या सोबत ढिश्‍यूम.. ढिश्‍यूम... करा असा अजब सल्ला महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शालेय विद्यार्थांना शुक्रवारी (ता.21) दिला.

शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. शुक्रवार व शनिवारी (ता. 22) असे दोन दिवस नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. शुक्रवारी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या फेऱ्या काढण्यात आल्या. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी यावेळी विद्यार्थांसोबत संवाद साधला.

ते म्हणाले, आपल्या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचे जतन करण्याची आपली जबाबदारी आहे. मात्र अनेक जण ऐतिहासिक गेट परिसरात कचरा टाकतात. तोडफोड केली जाते, हे चुकीचे आहे. ऐतिहासिक वास्तूंची नासधूस करणाऱ्यांना समजून सांगितले पाहिजे. मात्र, ते ऐकत नसतील तर ढिश्‍यूम.. ढिश्‍यूम करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थांना दिला. शहरातील अनेक शाळांनी फेरीमध्ये सहभाग घेतला. या विद्यार्थांना गेटसह ऐतिहासिक वास्तू दाखविण्याचे आवाहन आयुक्तांनी शिक्षकांना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com