राजकीय वळण न लागता समाजासाठी महामंडळ असावे - नरेंद्र पाटील

प्रकाश बनकर
सोमवार, 23 डिसेंबर 2019

औरंगाबाद : "भाजप सरकारच्या काळात मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे काम सुरू केले. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलले. 12 डिसेंबरला मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला; मात्र त्यांनी तो मंजूर केला नाही. अधिवेशन काळात त्यांनी नागपूरला बोलावून मंडळाचा आढावा घेत अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या मंडळाला राजकीय वलय न लावता ते समाजासाठी असावे, अशी अट घातली. ती मुख्यमंत्री यांनी मंजूर केली असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी (ता. 22) सांगितले. 

मराठा बिजनेस नेटवर्कतर्फे (एमबीएन) जळगाव रोडवरील मराठा मंदिराच्या हॉलमध्ये एमबीएन प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमास प्रदीप सोळुंके, शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात, लोकविकास बॅंकेचे संजय औटी, कॅनरा बॅंकेचे व्यवस्थापक, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ व्यवस्थापक मंगेश देशमुख, सीए बद्रिनाथ खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची संपूर्ण माहिती देण्यात आली. कर्जप्रकरण करताना काय काळजी घ्यावी यासह विविध माहिती देण्यात आली. 

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

म्हणून  राजीनामा दिला....

नरेंद्र पाटील म्हणाले, राज्यात जितकी महामंडळे आहेत ती आर्थिक घोटाळ्याच्या अडचणीत आहेत. प्रत्येक समाजाच्या विकासासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. मात्र अण्णासाहेब पाटील महामंडळ सोडता सर्वच महामंडळांची चौकशी सुरू आहे. सरकार बदलले यामुळे या महामंडळालाही राजकीय वळण लागेल म्हणून मी 12 डिसेंबरला राजीनामा दिला होता.

येथे क्‍लिक करा: समृद्धीच्या कामाचा असाही साईड इफेक्‍ट    

राज्यातील 11 हजार तरुण-तरुणींना 550 कोटींचे कर्ज

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बोलावले. या महामंडळाचा आढावा घेतला. मराठा समाजाच्या विविध संघटनांतर्फे नरेंद्र पाटील यांना अध्यक्ष करा अशा विनंतीची पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली. त्यामुळे त्यांनी राजीनामा मंजूर केला नाही. महामंडळातर्फे राज्यातील 11 हजार तरुण-तरुणींना 550 कोटींचे कर्ज वितरित केलेले आहे. या महामंडळाअंतर्गत घेतलेल्या सर्व कर्जांची वेळेवर परतफेड केली जात आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - ९५ वर्षांचा ‘तरुण’ देतोय व्यायामाचे धडे !    

सध्या पक्षबदलाची मनःस्थिती नाही 
महामंडळाचे काम करताना लाभार्थी कुठल्या पक्षाचा आहे, हे न पाहता तो मराठा समाजाचा आहे. त्याला लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी काम करावे. भविष्यात याला राजकीय रंग लागल्यास हे मंडळ चांगल्या पद्धतीने चालणार नाही. याच पद्धतीने काम करीत आहे. मात्र सध्या पक्षबदल करायची मनःस्थिती नाही आणि मला ते आवडणारही नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There should be a corporation for the society without any political change - Narendra Patil