गेवराईच्या न्यायालय आवारात दोन गटांत फ्रिस्टाईल

वैजिनाथ जाधव
गुरुवार, 5 जुलै 2018

बैठकीत समेटाची चर्चा सुरू असताना हिना यांच्या पती कडील मंडळींनी अपणास्पद शब्द वापरल्यामुळे वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याने गोंधळ उडाला.

गेवराई (जि. बीड) : दोन वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेला पती - पत्नीच्या भांडणाचा वाद मिटविण्यासाठी आलेले दोन्ही गटातील लोक अचानक एकमेकांना भिडले आणि फिल्मी स्टाईलने मारामारी झाल्याची घटना गुरूवारी (ता. पाच) येथील न्यायालयाच्या आवारात घडली. यानंतर या ठिकाणी एकच गर्दी झाली. 

याबाबत अधिक माहिती अशी, हीना जब्बार पठाण (वय 28, रा. जाटवळ मानुर, ता. शिरूर कासार ) जब्बार पठाण या पती - पत्नीमध्ये दोन वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू आहे. या दाम्पत्याचा 2009 साली मुस्लिम रितीरिवाजा नुसार विवाह झालेला आहे. त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे. काही दिवसांनी पती पत्नी मध्ये वाद झाला. त्यामुळे हिना यांनी आपल्या पती व सासरच्या मंडळी विरूद्ध गेवराई न्यायालयात पोटगी व घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. सदरील प्रकरण मिटविण्यासाठी दोन्ही गटातील प्रमुखांनी समेट घडवून आणला. या नुसार  गुरूवारी सकाळी न्यायालयात दोन्ही गटाचे लोक हजर होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोर्ट आवारातील एका हॉटेल मध्ये या तडजोडीची पुन्हा बैठक बसली.

बैठकीत समेटाची चर्चा सुरू असताना हिना यांच्या पती कडील मंडळींनी अपणास्पद शब्द वापरल्यामुळे वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याने गोंधळ उडाला. हिना यांच्याकडील गटाने जब्बार पठाण (वय 28) यांच्यासह चार जणांना लक्ष करत जबर मारहाण केल्याने यामध्ये काहीजण जखमी व रक्तबंबाळ झाले आहेत. या रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी न्यायाधीच्या दालनाकडे धाव घेत आम्हाला वाचवा असा आरडाओरडा केला. या दोन्ही गटातील लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हाणामारीत जखमींना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले. यानंतर दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पळापळ केली. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया गेवराई पोलिस ठाण्यात सुरु आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: There was a clash between two groups at the Gevrai Court premises