मनुष्यबळाअभावी तुंबला 'मकबरा'; तिकीट खिडकीवर नंतर प्रवेशावेळीही लागल्या रांगा

अतुल पाटील
रविवार, 26 ऑगस्ट 2018

दोन ठिकाणी केवळ रांगेत तासभर वेळ जात असल्याने प्रवेश द्वारवर कॉईन स्कॅन करण्यासाठी उपस्थित कर्मचाऱ्याकडे पर्यटक नाराजी व्यक्‍त करत होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक दिलीप खमारी यांच्याशी या प्रकाराबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

औरंगाबाद : रक्षाबंधनानिमित्त रविवारी (ता. 26) पर्यटनस्थळी झालेली गर्दी 'बीबी-का-मकबरा'तही होती. मात्र इथल्या मनुष्यबळाअभावी पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला. लांबच्या लांब रांगा लागल्याने मकबरा अक्षरश: तुंबला होता. आधी तिकीट खिडकीवर नंतर प्रवेशावेळी अशा दोन-दोन ठिकाणी रांगा लावाव्या लागल्याने पर्यटकांनी 'सकाळ'कडे राग व्यक्‍त केला. 

रक्षाबंधन आणि रविवार एकाच दिवशी आल्याने मकबऱ्यात पर्यटकांची गर्दी अधिक होती. यावेळी लोकांना तिकीट खिडकीवर रांगा लावून कॉईन घ्यावे लागले. कॉईन घेऊन मकबऱ्यात प्रवेश करतानाही तीन एंट्री पॉईंट आहेत. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने लांबच्या लांब रांगा लागल्या. दोन ठिकाणी केवळ रांगेत तासभर वेळ जात असल्याने प्रवेश द्वारवर कॉईन स्कॅन करण्यासाठी उपस्थित कर्मचाऱ्याकडे पर्यटक नाराजी व्यक्‍त करत होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक दिलीप खमारी यांच्याशी या प्रकाराबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. 

दख्खनचा ताज अशी मकबराची ख्याती आहे. अर्थातच विविध राज्यासह जगभरातून येणाऱ्या पर्यटकांनी मकबरा नेहमीच फुललेला असतो. रंगीत जाड कागदापासून क्‍यूआर कोड स्कॅनरपर्यंतच्या प्रवासात तिकीट दर मर्यादित होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी कॉईन स्कॅनरच्या माध्यमातून मकबऱ्यात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे तिकीट दरही 25 रुपयांपर्यंत पोचला आहे. रोजच्या पर्यटकांच्या तुलनेत कॉईन अपुरे पडत आहेत. तिकीट खिडकीवर सुटीच्या दिवशी आणि रविवारी रांगाचे चित्र वारंवार दिसत आहेत.

Web Title: There was a crowd at Bibi ka maqbara aurangabad because lack of Manpower