जावयाने घेतला सासऱ्याच्या नाकाचा चावा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

लातूर - धोंड्याचा महिना आताच कुठे संपला. या काळात जावयाचा सन्मान केला जातो. मात्र एका जावयाने पत्नीला मारहाण सुरु केली. सासरा वाचविण्यासाठी आल्यावर जावयाने सासऱ्याच्या नाकाचा चावा घेऊन तुकडाच पाडला. ही घटना लातूर येथे घडली आहे. 

भादा हे लातूर जिल्ह्यातील एक गाव. येथील नागनाथ शिंदे यांची मुलगी रेखा आपल्या माहेरी आली होती. काही वर्षांपूर्वी रेखाचे लग्न संतोष यादव याच्याशी झाले होते. व्यवसायाने आचारी असलेला संतोष हा दारूच्या आहारी गेला आहे. या दांम्पत्यास तीन अपत्ये आहेत. संतोष पत्नी रेखाला कायम मारहाण करत असे. यामुळे कायम तणावाखाली राहणारी रेखा लहान बाळास घेऊन संतोष बरोबर राहण्यास तयार होत नव्हती. ती माहेरी निघून आली. 

यातच संतोष भादा येथे आला. दारू घेऊन तो नशेत होता. आल्या आल्या त्याने रेखास मारहाण करण्यास सुरवात केली. वडील नागनाथ हे लेकीला वाचविण्यासाठी मध्ये पडले. संतोषने नागनाथ यांनाही मारहाण करण्यास सुरवात केली आणि या झटापटीत त्याने नागनाथ यांचे नाकास कडकडून चावा घेतला. यात नागनाथ यांच्या नाकाचा शेंडा तुकडा बाजूला झाला. गावकरी मध्यस्थी करत होते. मात्र संतोष कोणाचे ऐकण्यास तयार नव्हता. या प्रकरणी भादा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
 
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There was a fight between the father in law and the son in law