चोरट्यांनी एकाच रात्रीत केली अन्न, वस्त्र अन्‌ दारूची सोय!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

निलंगा - शहरातील शिवाजीनगर भागात गुरुवारी (ता. १०) रात्री चोरट्यांनी मद्यपानासाठी बिअर शॉपी फोडून बिअर चोरली, तर जेवणासाठी हॉटेल फोडले. पाणी पिण्यासाठी एका मेडिकल दुकानातून पाण्याच्या बाटल्या चोरल्या. चोरटे इथेच न थांबता त्यांनी कपड्यासाठी कापड दुकानातही चोरी केली. चोरट्यांनी एकाच रात्री अन्न, वस्त्र व नशेसाठी केलेल्या चोरीच्या प्रकाराची व चोरट्यांची शहरात जोरदार चर्चा सुरू असून तपासासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान तयार झाले आहे.  

भुरट्या चोरट्यांनी सुरवातीला श्री नंदन बिअर फोडून बाटल्या चोरल्या आणि मनसोक्त मद्यपान केले. त्यानंतर भूक लागली म्हणून शेजारच्या एका हॉटेलमधून शटर तोडून चमचमीत पदार्थांवर ताव मारला. तेथून त्यांनी आपला मोर्चा फॅशन वर्ल्ड येथील दुकानाकडे वळविला. शटर तोडून जीन्स पॅन्ट, शर्ट लांबविले. 

तहान लागली म्हणून चोरट्यांनी श्रीनिवास मेडिकलमधून पाण्याच्या बाटल्या, पाच हजार रुपये लांबविले.

Web Title: Thief Food Cloth Wine Theft Crime