माजलगाव तालुक्यात साडेतीन लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

घराचा पाठीमागील दरवाजा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त टाकले. तर कपाटातील ऊसाचे आलेले ५८ हजार रूपये व १९ ग्रॅम वजनाचे सोण्याचे नेकलेस, ३२ ग्रॅम वजनाचे गंठण, दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, पाच गॅ्रमची चैन असे दोन लाख 27 हजार रूपये किमंतीचा ऐवज लंपास केला.

माजलगांव (जि. बीड) : शहरासह तालुक्यामध्ये चो-यांचे सत्र सुरूच असुन शनिवारी (ता. १२) पहाटे दोन घरे फोडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील शेलगांवथडी येथे घडली.  

तालुक्यातील शेलगांवथडी येथील शेतकरी विष्णू विठ्ठलराव तौर यांचा मुलगा बाळासाहेब तौर याचा विवाह  रविवारी (ता. सहा) झाला होता. घराचा पाठीमागील दरवाजा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त टाकले. तर कपाटातील ऊसाचे आलेले ५८ हजार रूपये व १९ ग्रॅम वजनाचे सोण्याचे नेकलेस, ३२ ग्रॅम वजनाचे गंठण, दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, पाच गॅ्रमची चैन असे दोन लाख 27 हजार रूपये किमंतीचा ऐवज लंपास केला. तर, या गावातील गोपीचंद अशोक जाधव यांच्या गेटचे कुलूप तोडून पत्राच्या पेटीत ठेवलेले सोन्या, चांदीच्या दागिण्यासह असा एक लाख रूपयांचा एैवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

दरम्यान याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शहर व तालुक्यात चो-यांच्या सत्र सुरूच आहे. 

Web Title: thief in Majalgaon

टॅग्स