नांदेड : गंठण चोर पोलिसांच्या जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

सोन्याचे गंठण लंपास करणारा चोरट्यास भाग्यनगर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) ला रात्री अटक केली. त्याच्याकडून चोरलेले गंठण जप्त कऱण्यात आले. 

नांदेड : पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण लंपास करणारा चोरट्यास भाग्यनगर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) ला रात्री अटक केली. त्याच्याकडून चोरलेले गंठण जप्त कऱण्यात आले. जप्त केलेले गंठण न्यायालयाच्या आदेशावरून मुळ मालकास परत केले. ही घटना (ता. 9 सप्टेंबर) रोजी शिवमंदीर ते राज कॉर्नर रस्त्यावर घडली होती. 

तरोडा नाका ते शिवमंदिर रस्त्यादरम्यान किशोर सरोदे यांची नातेवाईक असलेलेली महिला घराकडे पायी जात होत्या. राज कॉर्नर परिसरात येताच सदर महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीचे दिड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अनोळखी चोरट्यांनी जबरीने चोरून पळ काढला होता. या प्रकरणी किशोर गंगाराम सरोदे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीवरून, गोवर्धनघाट परिसरात राहणाऱ्या राजेश बिरजूलाल यादव (वय २७) याला अटक केली. त्याची अधिकची चौकशी केली असता, त्याने वरील गंठण चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दिड तोळे वजनाचे गंठण जप्त केले. न्यायालयाच्या आदेशावरून गंठण मुळ मालकाच्या ताब्यात दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves arrested in nanded