‘या’ जिल्ह्यातील चोरट्यांना कोठडी

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

नांदेड : एकट्या व्यक्तीला रस्त्यात गाठून त्याला मारहाण करून मोबाईल पळविणारी टोळी भाग्यनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधिश ( पाचवे ) एन. एल. गायकवाड यांनी शनिवारपर्यंत (ता. १६) पोलिस कोठडीत पाठविले आहे. हे सर्व आरोपी हिंगोली येथील रहिवाशी आहेत. 

नांदेड : एकट्या व्यक्तीला रस्त्यात गाठून त्याला मारहाण करून मोबाईल पळविणारी टोळी भाग्यनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधिश ( पाचवे ) एन. एल. गायकवाड यांनी शनिवारपर्यंत (ता. १६) पोलिस कोठडीत पाठविले आहे. हे सर्व आरोपी हिंगोली येथील रहिवाशी आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे करून नांदेड शहरात मागील काही दिवसांपासून वास्तव्यास होते. नांदेडमध्येही दुचाकीवरून मोबाईल जबरीने चोरणे किंवा एखाद्याला जबर मारहाण करून त्याच्याजवळील किंमती वस्तु पळविणे असे गुन्हे ते बऱ्याच दिवासपासून सतत करत होते. त्यांनी कैलासनगर भागात गौतम शितळे यांच्या नाकावर हातातील कड्याने मारून जखमी करून त्यांचा १० हजाराचा मोबाईल जबरीने लंपास केला होता. 

या प्रकरणाचा गुन्हा ता. १३ नोव्हेंबर रोजी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनी आपल्या वरिष्ठांच्या आदेशावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे मोबाईल जबरी चोरीचा तपास दिला. श्री. चव्हाण यांनी आपले सहकारी एपीआय वैभव भोसले, फौजदार श्रीकिशन कांदे, कर्मचारी सुमेध पुंडगे, जळबाजी भिसे, मारोती मुसळे यांची मदत घेत त्यांनी बुधवारी रात्री आपल्या हद्दीत गस्त घातली. 

गुप्त माहितीवरून श्री. चव्हाण यांनी मोबाईल चोर रोहन आनंदराव लबडे (वय २६) रा. आंबेडकरनगर, हिंगोली, राहूल भगवान खिल्लारे (वय २२) रा. आनंदनगर, हिंगोली, आणि निखील कल्याणकर डोरले (वय २२) रा. जिजामातानगर, हिंगोली या तिघांना आपल्या हद्दीतून रात्री ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता कैलासनगर येथील गुन्हा केल्याची कबुली देऊन चोरलेला मोबाईल परत केला. पोलिसांनी त्यांच्याकडून एक बुलेट दुचाकीही जप्त केली. तिन्ही आरोपी हे हिंगोली पोलिसांचे फरार व पाहिजे असलेले गुन्हेगार असून रोहन लबडे याच्याविरुध्द हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातून हद्दपारीचा प्रस्ताव हिंगोली उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एपीआय श्री. चव्हाण यांनी या तिन्ही मोबाईल चोरांना न्यायाधिश श्रीमती गायकवाड यांच्या न्यायालयात गुरूवार (ता. १४) हजर केले असता त्यांना शनिवार ( ता. १६) नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करित आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves detained in 'this' district