एकल महिला शिक्षिकांचा तरी विचार करा

संदीप लांडगे  
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

2019च्या बदल्या होऊन 138 शिक्षक-शिक्षिकांना मागूनही शाळा मिळाल्या नाहीत व ते विस्थापित झाले. प्रशासनाने नावे कोणतीही दिली तरी "रॅण्डम' आणि "विस्थापित'मधील एकल महिला शिक्षिकांचा प्रश्‍न गंभीर बनलेला आहे.

औरंगाबाद : राज्यात जून 2019मधील विस्थापित शिक्षिका व शिक्षक आणि 2018 मध्ये रॅण्डम फेरीमध्ये टाकल्या गेलेल्या शिक्षकांना नवीन शिक्षक भरतीपूर्वी पदस्थापना बदलून देण्याची मागणी "शिक्षक भारती' संघटनेसह अन्यायग्रस्तांनी केली आहे. 

रॅण्डम पद्धतीने पदस्थापना दिलेल्या शिक्षकांना नवीन भरतीवेळी समानीकरणाच्या जागेवर पदस्थापना देण्यासंदर्भात शासनाने गेल्यावर्षी 28 जूनलाच पत्र निर्गमित केलेले आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक हित लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला. याचदरम्यान 2019च्या बदल्या होऊन 138 शिक्षक-शिक्षिकांना मागूनही शाळा मिळाल्या नाहीत व ते विस्थापित झाले. प्रशासनाने नावे कोणतीही दिली तरी "रॅण्डम' आणि "विस्थापित'मधील एकल महिला शिक्षिकांचा प्रश्‍न गंभीर बनलेला आहे.

आता नवीन शिक्षक भरती अन्यायग्रस्तांना शेवटची संधी आहे. त्यामुळे विस्थापित व रॅण्डममधील शिक्षकांना दुरुस्ती करून पदस्थापना मिळावी, अशी मागणी मीरा चव्हाण, कस्तुरी कुलकर्णी, अर्चना पवार, सुजाता गोरडे, सुनीता पवळ, शुभांगी फुटाणे, सविता पवार, श्रीमती फलके, अनुराधा उसरे, छाया कुलकर्णी, संगीता मोहिते, भारती शेवाळे, सविता नागरे, उषा गाडेकर, रेखा तोंडे, छाया महाजन, योगेश शिसोदे, यकीन सय्यद, विशाल सोनवणे, गुलचंद पिठले, रामेश्वर पानकर, पुण्यशील टेंभूरकर, नितीन पवार, नेताजी भोसले, नीलिमा अजबे, अर्चना सुरवसे, शीतल शेळके, हर्षाली डांगे, शिल्पा बढे, कांचन उणे, अर्चना चांदवडकर आदींनी केली. 
 

रॅण्डम, विस्थापित एकल महिला शिक्षिका, शिक्षक यांना नवीन शिक्षक भरतीपूर्वी समानीकरणाच्या जागा खुल्या करून त्या जागी दुरुस्तीने पदस्थापना द्याव्यात. बदली धोरणाने प्रत्येक संघटनेत अनेक संवर्ग झाल्याने अन्यायग्रस्त शिक्षकांना एकत्र करून मराठवाडा कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनाकडे बाजू मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ आम्ही उभे केले. शिक्षक भरतीपूर्वी सर्व अन्यायग्रस्तांसाठी शेवटपर्यंत लढू.

- संतोष ताठे, समन्वयक, मराठवाडा कृती समिती व राज्य संपर्कप्रमुख, शिक्षक भारती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Think of single female teachers as well