रब्बीतील पिंकाना लोअर दूधना धरणातून तिसरे पाणी आवर्तन लवकरच

विलास शिंदे
Friday, 5 February 2021

लोअर दूधना प्रकल्पामुळे सेलू, परभणी, जिंतूर व मानवत तालुक्यातील तेरा हजार पाचशे हेक्टर वरिल रब्बीच्या पिकांना फायदा होत आहे.

सेलू ( जिल्हा परभणी ) : लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बीतील पिकांना दोन वेळेस पाणी आवर्तन सोडले होते. उर्वरित तिसरे पाणी आवर्तन येत्या आठ ते दहा दिवसात सोडण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

लोअर दूधना प्रकल्पामुळे सेलू, परभणी, जिंतूर व मानवत तालुक्यातील तेरा हजार पाचशे हेक्टर वरिल रब्बीच्या पिकांना फायदा होत आहे. या आगोदर धरणातून रब्बीतील पिकांना दोनवेळेस पाणी आवर्तन सोडण्यात आले होते. यावर्षी धरणाच्या लाभक्षेत्रात सतत पाऊस झाल्यामूळे लोअर दूधना प्रकल्प धरण शंभर टक्के भरले होते. सद्य: स्थितीत धरणात ८५. ९५ टक्के इतके पाणी उपलब्ध आहे. 

हेही वाचाखुशखबर...! परभणीसाठी दुसरे एक बसस्थानक मिळणार

लोअर दूधना प्रकल्प धरणातील पाण्याचा लाभ रब्बी पिकांसाठी मिळावा अशी मागणी लाभधारक शेतकर्‍यांतून झाल्यामूळे धरणाच्या जलाशयातुन इ. स. २०२०- २१ मधिल तीन पाणी आवर्तनाचे नियोजन ठरले होते. पहिले पाणी आवर्तन (ता. दोन ते ता. १५ ) डिसेंबर- २०२० मध्ये सोडण्यात आले.दूसरे पाणी आवर्तन ( ता. १२ ते ता. २५ ) जानेवारी- २०२१ मध्ये तसेच तिसरे पाणी आवर्तन फेब्रुवारी- २०२१ मध्ये देण्याचे ठरलेले आहे. त्यामूळे लवकरच धरणाच्या दोन्ही उजव्या व डाव्या कालव्यात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांसाठी फायदा होत असल्याने लाभधारक शेतकर्‍यांतून समाधान करित आहेत.

यावर्षीच्या रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हु या पिकांना लोअर दूधना प्रकल्पाच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर करुन उत्पादन वाढीकडे शेतकर्‍यांचा जास्त प्रमाणात कल आहे. त्यामूळे यावर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांमूळे ज्यास्तीचे उत्पादन मिळेल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The third water cycle from the Pinkana Lower Dudhna Dam in Rabbi is coming soon parbhani news