त्या १३ जणांची विलगीकरण कक्षात रवानगी, एकाला कोरोनाची बाधा

Ausa Corona Updates
Ausa Corona Updates

बेलकुंड (जि.लातूर) : हिप्परगा (ता.औसा) गावातील एका व्यक्तीचा अहवाल बुधवारी (ता.तीन) रात्री कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाच्या घराचा परिसर प्रशासनाने गुरुवारी (ता.चार) सकाळी सील करत रूग्णांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.  


मुंबई येथून प्रवास करून हिप्परगा (ता.औसा) येथे आठ जण आले होते. दरम्यान यामधील एका व्यक्तीला कोरोना सदृश्‍य लक्षणे दिसून येत असल्याने वैद्यकीय चाचणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेत पाठविण्यात आले होते. मात्र यातील एका व्यक्तीचा अहवाल बुधवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. भारती यांनी रात्री हिप्परगा येथील गावात भेट देत बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेत गुरूवारी सकाळी आरोग्य विभाग, महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाने हा परिसर सील केला.

बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याच बरोबर आरोग्य विभागाकडून या भागातील सर्व ग्रामस्थांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून मुंबईहून परतलेल्या या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे.  यावेळी वैद्यकीय अधिकारी अमजद पठाण, वैद्यकीय अधिकारी एस. एस हिंडोळे, ग्रामसेवक तुकाराम बिराजदार, तलाठी निळकंठ जाधव, एच. डी. राठोड, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या आदी उपस्थित होत्या.  
 

लाच स्वीकारताना पोलिस नाईकला पकडले
देवणी  (जि.लातूर) ः दहा हजारांची लाच घेताना वलांडी (ता. देवणी) येथील पोलिस चौकीचे पोलिस नाईक मुरलीधर दंतराव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. येथील पोलिस चौकीत बुधवारी (ता. तीन) दुपारी ही कार्यवाही करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की तक्रारदार यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात असलेले तक्रार अर्ज प्रकरण मिटविण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती; मात्र तडजोडीअंति दहा हजार रुपयांवर प्रकरण मिटविण्याचे ठरविल्यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांच्याकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुमार दराडे व बाबासाहेब काकडे यांनी सापळा रचून आरोपी मुरलीधर दंतराव यांना लाचेच्या रकमेसह पकडले. या घटनेमुळे वलांडीसह परिसरात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com