esakal | खचू नगंस अरे मर्दा ही वेळ निघून जाईल रे- कवितांमधून जागविला आत्मविश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

सेलू कोविड सेंटर

खचू नगंस अरे मर्दा ही वेळ निघून जाईल रे- कवितांमधून जागविला आत्मविश्वास

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : लाख दुः ख सल यातना घालती तांडव अंगणात, जप जिवाला अस्मानाचे झेलून तू हे आघात, काळोख सरुन गर्द हा उज्वल काळ येईल रे, खचु नगस अरे मर्दा ही वेळ निघून जाईल रे. या कवी दिगंबर रोकडे यांच्या कवितेने बाधीत रुग्णांचा जगण्याचा आत्मविश्वास वाढवला. शहरातील मराठा सेवा संघ, संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्ट आणि समस्त सेलूकरांच्यावतीने संचलित बळीराजा मोफत कोव्हीड केअर सेंटरमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त बुधवारी ( ता. २६ ) रोजी कवी संमेलनाचे आयोजन केले होते.

कोरोना कोव्हीड १९ चे नियम पाळून फक्त सेंटरमधे उपचार घेत असलेल्या बांधवांसाठी आयोजित या कवी संमेलनात कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करुन बाधीत रुग्णांची मने जिंकली. या कवी संमेलनात प्रभू शिंदे यांनी ' मिरग ' ही कविता सादर केली. ते आपल्या कवितेत म्हणतात, ' आला आला हो मिरग, आल्या पावसाच्या सरी, हाती घेऊन तिफणं, शेती गेला शेतकरी 'तर माधव गव्हाणे आपल्या ' इंडिया इज ग्रेट ' या कवितेत म्हणतात , ' तुमचं कसं सगळं चालतं ऑनलाईन बिनलाईन, शहरातून दळून आणतो, आमची नसते म्हणून लाईन, इकडं मोबाइलला सुद्धा मिळत नाही थोडंही नेट, खरंच राव इंडिया आहे खूप ग्रेट ' तर कवी दिलीप दौड आपल्या ' महापुरुषांची पुण्याई ' या कवितेत म्हणतात ' बहुजनांचे कैवारी, झिजले चंदनाच्यापरी, गंध मानवतेचा पांगला, मिटल्या जातीच्या गं दरी ' कवी शरद ठाकर यांनी आपल्या कवितेतून कोरोनाशी लढण्याची हिंमत जागविली ते म्हणतात , ' माय बाप दोस्त हो, हिंमत नका हरु, कोरोनाशी आपले, आता युद्ध आहे सुरु' तर कवी सुरेश हिवाळे यांनी आपल्या ' तथागत ' या कवितेतून भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.

हेही वाचा - पीडित महिलेने पोलिस ठाणे गाठले. संशयित आरोपीला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

ते म्हणतात, ' तू सत्य शाश्वत, नैसर्गिक तत्व, त्यालाच महत्व, दिले बुध्दा, गौतमा आहेस, तू कणाकणात, विश्वाच्या मनात, चिरंतन ' वैशाखी बुद्ध पोर्णिमेच्या चंद्र प्रकाशात कोव्हीड सेंटरमधे उपचार घेत असलेल्या बांधवांना कवी संमेलनात सादर झालेल्या जगण्याच्या कवितेतून नक्कीच बळ मिळाले. ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. कवी संमेलनाचे सुत्रसंचलन कवी सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शरद ठाकर यांनी केले. कार्यक्रमास छगन शेरे, सर्जेराव लहाने, मिलिंद सावंत, रणजित गजमल, अविनाश शेरे, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, वसंत बोराडे, बाबासाहेब पावडे, कृष्णा रोडगे, सुधीर डिक्कर यांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे