esakal | यंदाही शाळा मोबाइलवरच भरणार, घरी जाऊन प्रवेश निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

दाबका (ता.उमरगा, जि.उस्मानाबाद) :  जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी घरापर्यंत जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करून त्यांचे स्वागत केले.

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी होणारा विद्यार्थ्यांच्या किलबिलाट दुसऱ्या वर्षीही ऐकायला मिळाला नाही. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जात आहेत.

यंदाही शाळा मोबाइलवरच भरणार, घरी जाऊन प्रवेश निश्चित

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा(जि.उस्मानाबाद) : कोरोनाच्या Corona पहिल्या लाटेत सहजपणे पुढच्या वर्गात प्रवेश मिळालेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा दुसऱ्या लाटेतही पुढच्या वर्गात प्रवेशाची संधी मिळाली. आता मंगळवारपासून (ता. १५) शैक्षणिक वर्ष सुरू झाले. दरम्यान, शाळेत शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती अनिवार्य असून, विद्यार्थ्यांसाठी Student जरी शाळा बंद राहणार असली तरीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षकांना प्रवेशासाठी आणि सर्वेसाठी विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जावे लागत आहे. शिक्षकांनी पहिल्या दिवशी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चत करून त्यांचे स्वागत केले. मधल्या काही महिन्यांचा अपवाद वगळता दीड वर्षापासून ऑनलाइन वर्ग Online Classe भरत आहे. पण, अनेकांना ऑनलाइन शिक्षणात अडथळा येत आहे. काही मुले अभ्यासाच्या नावावर मोबाइलमध्ये गेम खेळत आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल आणि विद्यार्थ्यांचे नाते घट्ट झाले आहे. याही वर्षी असेच चित्र राहणार आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी होणारा विद्यार्थ्यांच्या किलबिलाट दुसऱ्या वर्षीही ऐकायला मिळाला नाही. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जात आहेत. जिल्हा परिषद असो की खाजगी शाळा येथील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या सर्वेसाठी फेरी सुरू आहे.This Year Classes Conduct Through Online, Admission Confirmed

हेही वाचा: कोविडची फक्त लाट ओसरली, कोरोना संसर्ग आटोक्यात आलाच असे नाही

शाळा मुलांच्या दारी

दाबका येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ‘शाळा मुलांच्या दारी’ हा उपक्रम राबवला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे प्रवेश निश्चित केले. पुष्पगुच्छ, खाऊ व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत केले. सरपंच शकुसूम मुटले, उपसरपंच गोविंद मेजर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंगद गायकवाड, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. शौकत पटेल यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. मुख्याध्यापक एस. आर. वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एन. कोळी, यू. एस. बदोले, व्ही. जी. बिराजदार यांनी यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल व बालाजीनगर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केले नवगतांचे स्वागत केले. नगरसेविका सुनंदा वरवटे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य रुकसाना मुंगले, केंद्रप्रमुख शीला मुदगडे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, मुख्याध्यापक बाबूराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काळे प्लॉट व हमीदनगरमधील पहिलीच्या चाळीस मुलांना प्रवेश देण्यात आला. तर पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

शासनाच्या निर्देशानुसार शाळेत पन्नास टक्के शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन प्रवेश प्रक्रिया, लॉकडाउनमुळे परतलेल्या कुटुंबातील मुलांचे प्रवेश यासाठी शिक्षक सर्वे करत आहेत. शिवाय ऑनलाइन शिक्षणाची माहिती देण्यात येत आहे.

- शिवकुमार बिराजदार, गट शिक्षणाधिकारी

loading image