संशयित इसिस समर्थकाची कसून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

औरंगाबाद - नांदेड एटीएसने कारवाई करीत परभणीतून उचललेल्या नासेर बिन अबुबकर गाफई याला नांदेड येथील दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. त्यानंतर गुरुवारी त्याला औरंगाबादेत नेण्यात आले. त्याची एटीएसकडून कसून चौकशी सुरू असून, त्याची ऑनलाइन कनेक्‍शन्स तपासली जात आहेत.

नासेर बिन अबुबकर गाफई (चाऊस) हा इंटरनेटवरील ट्विटर, टेलिग्राम, स्काइप व मॅसेंजर या ऍप्सच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात होता. इसिसमध्ये सामील होण्यासाठी तो इराक व सिरिया येथे जाणार होता, असा एटीएसला संशय आहे. दरम्यान, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. पठाण यांच्यासमोर नासेरला हजर केले असता त्याला 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: A thorough investigation of suspected Isis samarthakaci