परभणी शहरात पोलिसांचे धाडसत्र; हजारो रुपयांची दारू जप्त

Thousands rs. of liquor seized in parbhani
Thousands rs. of liquor seized in parbhani

परभणी- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुरुवारी (ता.13) विशेष मोहिम राबवून शहरातील विविध भागात छापे टाकण्यात आले. यात हजारो रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे या शहरात हा व्यवसाय करणाऱ्या चार महिलांसह सात पुरुषांना पोलिसांनी पहाटेच अटक केली आहे.

परभणी शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना मिळाली होती. उपाध्याय यांनी या प्रकरणी कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांना आदेश देऊन छापे मारण्यास सांगितले. त्यानुसार, गुरुवारी (ता.13) पहाटे चार वाजल्यापासून छापे मारण्यास सुरुवात करण्यात आली. शहरातील मराठवाडा प्लॉट, वांगीरोड व उस्मानिया कॉलनी या तीन ठिकाणी पोलिसांच्या पथकाने छापे मारून हजारो रुपयांची दारु जप्त केली.


मराठवाडा प्लॉट परिसरातील जयश्री कनकुटे या महिलेस ताब्यात घेऊन तिच्याकडून 3 हजार 532 रुपयाची दारू जप्त करण्यात आली, वांगी रोडवरील मिलींद श्रीराम घागरमाळे या व्यक्तीस अटक करून त्याच्याकडून 57 हजार 836 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तसेच उस्मानिया कॉलनी येथील शेख मैन्नुरिसा शेख हुसेन या महिलेस अटक करून तिच्याकडून 7 हजार 800 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

हाय ब्रँड दारूची होत होती विक्री
पोलिसांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत देशी दारूसह महागड्या ब्रँडची दारू देखील जप्त करण्यात आली आहे. ही महागडी दारू जप्त करण्यात आली आहे. 

कारवाई यापुढे अधिक तीव्र करणार
गणेशोत्सवाच्या काळात अवैध दारू विक्रीस वेग येत असतो. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे आजपासून सलग दहा दिवस अशा कारावाईसाठी पोलिसांनी योजना तयार केली आहे. त्याची अंत्यत कडक अंमलबाजवाणी केली जाईल.- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधिक्षक, परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com