औरंगाबाद-हैदराबाद या पॅसेंजरचे इंजिनसह तीन डबे रुळावरून घसरले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

उदगीर - औरंगाबादहून हैदराबादकडे निघालेल्या पॅसेंजर गाडीचे (क्र. 57550) इंजिन व तीन डबे रुळावरून घसरून गुरुवारी (ता. 20) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास काळगापूर (ता. भालकी) येथील मांजरा नदीच्या पुलाजवळ अपघात झाला. यात कुठलीही जीवितहानी झाली नसून, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 

औरंगाबादहून हैदराबादकडे उदगीर मार्गावरून निघालेल्या पॅसेंजर रेल्वेगाडीचे इंजिन व तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर हा मार्ग बंद करून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील गाड्या इतर मार्गावरून वळवल्या आहेत. काळगापूरजवळील मांजरा नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. रेल्व रूळ तुटल्याने हा अपघात झाला आहे. हा रूळ कसा तुटला की तोडला गेला, यामागे घातपात आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. 

अपघाताची माहिती कळताच भालकीचे मंत्री ईश्वर खंड्रे, बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. कर्नाटक महामंडळाच्या बसेस बोलावून या रेल्वगाडीतील प्रवाशांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी अपघातस्थळी भेट दिली. या अपघातातील जखमींना भालकीच्या शासकीय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात नियमित ट्रॉपी चेकअप या रूटचे झाले होते; तरीही हा अपघात झाला आहे. शुक्रवारी (ता. 21) दिवसभर या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या इतर मार्गे वळवण्यात आल्या होत्या. दिवसभर हा मार्ग बंद ठेवून अपघात झालेले डबे व इंजिन रुळावर आणण्याचे काम सुरू होते. उदगीरहून शुक्रवारी बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. 

Web Title: Three coaches collapsed with the passenger engine