उस्मानाबाद : मुलीच्या अन्ननलिकेतून काढली तीन नाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

उस्मानाबाद - सातवर्षीय मुलीने गिळलेली, अन्ननलिकेत अडकलेली तीन नाणी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. येथील जिल्हा रुग्णालयात अशाप्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली. ती यशस्वी झाली.

येथील बालाजीनगर परिसरातील उज्ज्वला शंकर काळे (वय ७) ही रविवारी (ता. २९) दुपारी चारच्या सुमारास घरासमोर खेळत होती. खेळता-खेळता तिने दोन रुपयांची दोन, एक रुपयाचे एक अशी तीन नाणी गिळली. पालकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील कान-नाक व घसा तज्ज्ञ डॉ. सचिन देशमुख यांच्यासह डॉ. रवींद्र पापडे व टीमने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

त्यानुसार आज सकाळी यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून तिच्या अन्ननलिकेतून तिन्ही नाणी बाहेर काढली. शासकीय रुग्णालयामध्ये अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. तंत्रज्ञान, सुविधांच्या कमतरतेमुळे अनेकदा असे रुग्ण रेफर करावे लागतात. तरीही आव्हान स्वीकारून, पारंपरिक पध्दतीचा अवलंब करून डॉक्‍टरांनी नाणी काढली. त्यामुळे या टीमचे कौतुक होत आहे.  अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे (इंडोस्कोपी) विनाधोका पार पडतात. या प्रकरणात मात्र डॉक्‍टरांनी रबरी नळीचा वापर केला. रबरी नळी नाण्याच्या खालच्या भागापर्यंत नेत त्यातील फुगा फुगवून नाणे काढण्यात आले. अशाप्रकारे एखादे नाणे काढणे तसे फारसे अवघड नसते; पण एकाचवेळी दोन-तीन नाणी काढणे हे नक्कीच धोकादायक असते, असेही सांगण्यात आले. डॉ. देशमुख यांनी वेगवेगळ्या प्रकरणांत आतापर्यंत किमान दीडशे नाणी काढली आहेत.

अनेकदा पालक मुलांच्या हाती नाणी देतात. मुले ती तोंडात घालतात. नकळत गिळली जातात. या प्रकरणात नाणे अन्ननलिकेत गेल्याने काढणे तसे शक्‍य झाले. ती श्वासनलिकेत गेल्यास अत्यंत धोकादायक ठरू शकते. अर्थात नाणे गिळणे हा सारा प्रकारच धोकादायक आहे. खबरदारी म्हणून पालकांनी लहान मुलांच्या हाती नाणी देऊ नयेत. 
- डॉ. सचिन देशमुख, कान-नाक-घसा तज्ज्ञ.

Web Title: Three coins drawn from a girl nymph