
लातूर जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा ६६१ वर गेला आहे.
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा ६६१ वर गेला आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. दहा) ३२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, एकूण बाधितांचा आकडा २२ हजार २४४ वर गेला आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता. नऊ) कोरोनाचा उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. यात येथील खोरी गल्लीतील ७४ वर्षीय व्यक्ती, शारदानगर भागातील ६० वर्षीय महिला तर औसा येथील ८० वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा ६६१ वर गेला आहे. दरम्यान, गुरुवारी ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा २२ हजार २४४ वर गेला आहे. यात ३८२ जणांवर उपचार सुरू असून, २१ हजार २०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
लातूर कोरोना मीटर
एकूण बाधित ः २२,२४४
उपचार सुरू असलेले ः ३८२
बरे झालेले ः २१,२०१
मृत्यू ः ६६१
Edited - Ganesh Pitekar