हिंगोलीतील तीन कोरोना योध्यांचा राज्यपालांच्या हस्ते झाला गौरव

राजेश दारव्हेकर
Friday, 16 October 2020

राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा , महसूल विभाग, पालिका प्रशासन आदी विभागाने विविध उपाययोजना करून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे.

हिंगोली : कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या राज्यातील ३८ कर्मचाऱ्यांचा मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १५) गौरव करण्यात आला यामध्ये जिल्ह्यातील तिन कोरोना योध्यांचा समावेश आहे.

राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा , महसूल विभाग, पालिका प्रशासन आदी विभागाने विविध उपाययोजना करून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे. याशिवाय  आरोग्य यंत्रणेने शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती केली आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सर्व्हेक्षण करून रॅपिड अँटीजन टेस्ट व आरटी पीसीआर टेस्ट घेण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात मृत्यू दर ही कमी आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना योध्यानी जीवाची पर्वा न करता कोरोना काळात सेवा बजावली आहे. याची शासनाने दखल घेत विभागानुसार उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. 

हेही वाचा हिंगोली : सेनगाव तालुक्यात एका कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

यांचा आहे समावेश 

यामध्ये अधिपरीचारिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कक्ष सेवक, सफाईकामगार , आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचारिका, औषध निर्माण अधिकारी यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

तिघेही हिंगोली जिल्ह्यातील आहेत

औरंगाबाद विभागातून  केवळ चार आरोग्य कर्मचाऱ्यांची सत्कार सोहळ्यासाठी निवड झाली असून, यातील तिघेही हिंगोली जिल्ह्यातील आहेत. यामध्ये  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कक्ष सेवक संदीप मोरे , आखाडा बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका शोभा तोरकड तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिपरीचारिका जयश्री फतेपूरे या तिघांचा राज्यपालांच्या हस्ते कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावल्या बद्दल गौरव करण्यात आला  आहे. 

येथे क्लिक करा - हिंगोली : विविध  देवींच्या मंदिरात उद्या होणार घटस्थापना, नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीने

सध्या २९०९ रुग्णापैकी २६६६ रुग्ण बरे

दरम्यान जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क असुन शहरासह गाव पातळीवर कोरोना संदर्भात मार्गदर्शक सुचनाचे पालन केले जात आहे. दररोज होणाऱ्या तपासणीत आता रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. सध्या २९०९ रुग्णापैकी २६६६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य अधिकारी यांच्या सह कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. या कार्याची दखल घेत जिल्ह्यातील तीन कोरोना योध्द़ांचा सत्कार करण्यात आला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Corona warriors from Hingoli were honored by the Governor hingoli news