सासूला मारहाण; बीडमध्ये तीन सुनांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

बीड येथे सासूला मारहाण केल्याप्रकरणी तीन सुनांना आज अटक करण्यात आली. 

बीड : वृद्ध सासूस तीन सुनांनी एकत्र येऊन मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. 14) शहरातील मित्र नगर भागात घडली. धोंडाबाई सानप यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तीन सुनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुवर्णा लहु सानप, जयश्री अंकुश सानप, रंजना बाबासाहेब सानप असे गुन्हा नोंद झालेल्या सुनांची नावे आहेत. 

खडकवाडी (ता. पाटोदा) येथील धोंडाबाई अण्णा सानप (वय 70) या शहरातील मित्रनगरमध्ये मुलांसह राहतात. घरातील किरकोळ कारणावरुन वरील तीन्ही सुनांनी मिळून धोंडाबाई यांना मारहाण केली. गेल्या काही दिवसापासून धोंडाबाई यांची तब्येत खराब असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  
 

Web Title: Three daughter in law were arrested today for beating the mother in law at Beed