esakal | एसटीच्या कर्मचाऱ्यांना तीन दिवस सक्तीची हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

state transport

एसटीच्या कर्मचाऱ्यांना तीन दिवस सक्तीची हजेरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना आठवड्यातून तीन दिवस हजेरीसाठी आगारात बोलविले जात आहे. यातून कोरोना संसर्गाची शक्यता वाढत असून, गरजेपेक्षा जास्त कर्मचारी बोलवू नयेत, अशी मागणी कर्मचारी करीत आहे. दरम्यान, याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रकांनी दिली आहे.

जिल्ह्यात एसटी महामंडळाचे सहा डेपो आहेत. सुमारे दोन हजार ८०० ते तीन हजार कर्मचारी यामध्ये कार्यरत आहेत. शिवाय महामंडळाच्या ताफ्यातही मोठ्या प्रमामात बसेस आहेत. दरम्यान, महामंडळाची चाके पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात रुतली आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. असे असतानाही जिल्ह्यातील सर्वच म्हणजे सहाही आगारात वाहक-चालकांना हजेरीसाठी बोलावले जात आहे. आठवड्यातून तीन दिवस आगारात येऊन हजेरी लावण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

हेही वाचा: चिंताजनक! उमरग्यात महिनाभरात दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण

कोरोना संसर्गाची भीती

कोरोना संसर्गाने काही महामंडळातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक कर्मचारी पुन्हा बाधित येत आहेत. दरम्यान, आठवड्यातून तीन दिवस कर्मचारी आगारात हजेरीसाठी येत आहेत. मालवाहतूक वगळता एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. अनेक कर्मचारी ग्रामीण भागातून दुचाकीवर आगारात येत आहेत किंवा मिळेल त्या वाहनाने येत आहेत. यातून संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन दिवस हजेरीची अट काढून टाकावी, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

हेही वाचा: Mental health: 'अति विचार टाळून नॉर्मल रहा'

अत्यावश्यक सेवा-

शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थितीची अट लावली आहे. असे असताना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मात्र आठवड्यातून तीन दिवस हजर राहण्याचे आदेश दिले जात आहेत. अत्यावश्यक सेवा म्हटले की, शासकीय सेवा म्हणून महामंडळ्याच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले जाते. अन् शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना १५ टक्के हजेरी असताना एका दिवसाआड हजेरी कशासाठी घेतली जात आहे? यातून महामंडळाला काय साध्य करायचे आहे. जेव्हा काम असेल तेव्हा जरूर बोलवावे. पण, काम नसताना हजर राहण्याचे आदेश देणे म्हणजे कोरोना संसर्गास निमंत्रण दिल्यासारखे असल्याचे वाहक-चालक सांगत आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! आईने स्वतःच्या मुलांनाच फेकले घरावरून; चिमुरड्याचा मृत्यू

चालक आणि मेकॅनिक यांना काम असते. त्यांना नियमित गाड्या सुरू कराव्या लागतात. पण, इतरांना नाही. त्यासाठी वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये बदल केला जाईल.

- अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक अधिकारी, उस्मानाबाद.

loading image