घराच्या आगीत होरपळून तिघांचा मृत्यू

Fire
Fire

मुक्रमाबाद, (जि. नांदेड) - गाढ झोपेत असताना घराला लागलेल्या आगीत पती, पत्नी, मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मुक्रमाबाद (ता. मुखेड) येथे रविवारी (ता. 17) मध्यरात्री घडली. या घटनेतून बारावर्षीय मुलगा थोडक्‍यात वाचला; तर दुसरा पंधरावर्षीय मुलगा हैदराबादला आहे.

येथील ऐनुल्लाशहावल्ली येथील माळरानावर चारही बाजूंनी टीनपत्रे, गवताचे छत करून उभारलेल्या घरात व्यंकट तिम्मा पवार (वय 39) कुटुंबीय राहात होते. घराबाहेरील चुलीतील ठिणगी वाऱ्याने घरावर पडली आणि आग लागली. चारही बाजूंनी लाकूड, गवताच्या कुडाने वेढलेले घर, मदतीसाठी जवळपास कुणीही नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या वेळी घरात चौघे गाढ झोपेत होते. आग लागल्याचे लक्षात येताच पवार यांच्या पत्नी रेखाबाई (वय 35) यांनी दारात झोपलेल्या बारावर्षीय करण या मुलाला घराबाहेर ओढले व पती, मुलीला वाचविण्यासाठी पुन्हा घरात गेल्या. त्या वेळी त्या आगीत अडकल्या. जळती लाकडे, तप्त टीनपत्रे अंगावर पडल्याने व्यंकट तिम्मा पवार, रेखाबाई व्यंकट पवार, काजल व्यंकट पवार (वय 8) यांचा होरपळून मृत्यू झाला. मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com