नळदुर्ग किल्ल्यात बोट उलटून तिघांचा मृत्यू

भगवंत सुरवसे
शनिवार, 20 एप्रिल 2019

शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील काझी गल्लीतून आठ ते दहा मुले- मुली किल्ला पाहण्यासाठी गेले. हे सर्व युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे संचालक कफील मौलवी यांचे नातलग आहेत. या मुलांनी किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी बोटिंगमध्ये आठ ते नऊ जण बसले.

नळदुर्ग : येथील किल्ल्यात बोटिंग करतेवेळी सेल्फी घेत असताना बोट कलंडून तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (ता. २०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण नळदुर्ग येथील रहिवाशी आहेत. 

शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील काझी गल्लीतून आठ ते दहा मुले- मुली किल्ला पाहण्यासाठी गेले. हे सर्व युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे संचालक कफील मौलवी यांचे नातलग आहेत. या मुलांनी किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी बोटिंगमध्ये आठ ते नऊ जण बसले. बोट सुरु होऊन बोरी नदीच्या काठाकडे जात असताना एका मुलगा सेल्फी घेण्यासाठी जागेवरुन उठून पुढे गेला. त्यापाठोपाठ काही मुले आल्याने बोट कलंडत असल्याने गोंधळ उडाला. यातच तिघेजण बोरी नदीच्या पात्रात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शी घटना पाहणाऱ्यांनी सांगितले. सेफ्टी जँकेट असल्यामुळे बाकी सहा जणांना सुरक्षित बाहेर काढले, मात्र उर्वरित दोन मुली व एका मुलाचे जँकेट बोटीच्या आसनाला अडकल्याचे समजते. घटनेनंतर एका मुलीला पाण्याबाहेर तातडीने बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. मात्र या मुलीचे उपचारापूर्वी निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर तीन ते चार तासानंतर आणखी एका मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. एका मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. यावेळी नळदुर्गचे सहायक पोलिस निरिक्षक संजीवन मिरकले व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व किल्ल्यातील प्रत्यक्ष घटनास्थळावर पाहणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three died in boat accident at Naldurg