‘मेडिसीन’मध्ये स्ट्रेचर पॉइंटसाठी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - घाटीत उपचार चांगले मिळतात; मात्र रुग्ण दाखल करेपर्यंत अग्निदिव्य पार करावे लागते. याला ‘सकाळ’ने ता. १६ जानेवारीच्या अंकात वाचा फोडली होती. त्यानंतर नातेवाइकांची होणारी तारांबळ वेळोवळी ‘सकाळ’ने समोर आणली होती. त्याची दखल घेत घाटी प्रशासनाने मेडिसीन विभागात एक स्ट्रेचर पॉइंट केला असून, तीन शिफ्टमध्ये तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले. 

डॉ. सुक्रे व वैद्यकीय अीधक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी बुधवारी (ता. १३) घाटीच्या मेडिसीन व सर्जिकल इमारतीत पास यंत्रणेचा आढावा घेताला. त्यावेळी प्रकर्षाने जाणवलेल्या स्ट्रेचरच्या समस्येवर डॉ. सुक्रे यांनी तातडीने तीन स्ट्रेचर व दोन व्हिलचेअर मेडिसीन विभागाच्या प्रवेशद्वारावर कायम उभ्या ठेवण्याचे आदेश दिले. शिवाय त्यासाठी तीन कर्मचारीही नियुक्त केले आहेत. तथापि, मेडिसीन इमारतीतून सर्जिकल इमारतीकडे तपासणीला जाण्या-येण्यासाठी रुग्ण व नातेवाइकांची होणारी ससेहोलपट अद्याप थांबलेली नाही. त्यासाठी प्रशासन कधी उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ता. २५ मेरोजी सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यावेळी घाटीत किमान एक स्ट्रेचरसोबत एक कर्मचारी असेल, असे घाटी प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. 

Web Title: Three employees appointment for a stretcher point in Medicine